Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी आयपीएल शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी कोण आहे?

वैभव सूर्यवंशीबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

109
Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी आयपीएल शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी कोण आहे?
Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी आयपीएल शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी कोण आहे?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) अननुभवी खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) करारबद्ध केलं, तेव्हाच १३ वर्षांचा हा छोकरा कोण अशी चर्चा झाली होती. पण, बिहार क्रिकेटला तेव्हाच तो नवीन नव्हता. डावखुरा घणाघाती फलंदाज अशी त्याची ओळख आधीच निर्माण झाली होती. कारण, १२ व्या वर्षी त्याने बिहारकडून रणजी पदार्पण केलं. विनू मंकड करंडकात (Vinoo Mankad Trophy) तो बिहारच्या १९ वर्षांखालील संघात खेळला. त्याचवर्षी १२ वर्षं आणि २८४ दिवसांचा असताना बिहार संघात त्याची वर्णी लागली.

२७ मार्च २०११ रोजी समस्तीपूर जिल्ह्यात तजपूर इथं त्याचा जन्म झाला आहे. आणि वडिलांनी सुरुवातीपासून दिलेल्या प्रोत्साहनामुळे चौथ्या वर्षीच त्याने बॅट हातात धरली. सहाव्या वर्षी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. रणजी करंडक (Ranji Trophy) खेळणारा तो चौथा वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरला होता. सप्टेंबर २०२४ हा त्याच्या आयुष्यातील कलाटणी देणारा महिना ठरला. भारताच्या १९ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. आणि तिथे पठ्ठ्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५८ चेंडूंत शतक झळकावलं. जागतिक स्तरावर १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दुसरी वेगवान शतक होतं. पुढे जाऊन १९ वर्षांखालील आशिया चषकातही तो चमकला. आयपीएलच्या संघ मालकांच्या तोंडीही आपोआप त्याचं नाव यायला लागलं.

(हेही वाचा – IPL 2025, Vaibhav Suryavanshi : १४ व्या वर्षी आयपीएलमधील जलद शतक ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीविषयी जाणुन घ्या सर्वकाही …)

नोव्हेंबर २०२४ मध्येच राजस्थानने त्याला तब्बल १.१ कोटी रुपये मोजून खरेदी केलं. तेव्हा त्याचं वय होतं १३ वर्षांचं. १९ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) तो आपला पहिला सामना खेळला, तेव्हा त्याच्या फलंदाजीत अजिबात नवखेपणा नव्हता. त्याने २० चेंडूंत ३४ धावा केल्या. आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तिथून आता त्याने ३५ चेंडूंत शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे आयपीएलमधला तो एकमेव खेळाडू आहे, जो स्पर्धा सुरू झाल्यानंतर (२०१०) जन्मलेला आहे. स्पर्धेची सुरुवातच २००८ मध्ये झाली होती. अर्थात, वैभववर (Vaibhav Suryavanshi) अनेकदा वय चोरीचे आरोपही झाले आहेत. मागे त्यानेच एका मुलाखतीत आपण येत्या मार्चमध्ये १४ वा वाढदिवस साजरा करणार आहोत, असं म्हटलं होतं. ती मुलाखत २०२३ ची होती. म्हणजेच त्याचं वय आता जी नोंद आहे त्यापेक्षा दीड वर्षांनी जास्त असलं पाहिजे. पण, त्याविषयी कुठलीही चौकशी अजून झालेली नाही.

(हेही वाचा – Rani Baug मध्ये प्राणी, पक्षीच नाही तर मत्सजीवही पाहता येणार; महापालिका उभारणार ७० कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय मत्स्यालय)

पूर्ण नाव : वैभव अनिल सूर्यवंशी

वय : १४ वर्षे ३२ दिवस

जन्मतारीख : २७ मार्च २०११

जन्मस्थान : तजपूर,समस्तीपूर बिहार

शिक्षण : सध्या इयत्ता ९वी

उंची : ५ फूट ५ इंच

खेळण्याची भूमिका : डावखुरा आक्रमक फलंदाज व मध्यमगती गोलंदाज

आवडता खेळाडू : विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स

आवडते शॉट्स : कव्हर ड्राइव्ह, पुल शॉट

प्रेरणा : वडील आणि प्रशिक्षक यांचा पाठिंबा

पहिली मोठी स्पर्धा : अंडर-१९ राज्यस्तरीय स्पर्धा, जिथे त्याने सर्वाधिक धावा केल्या

आयपीएल संघ : राजस्थान रॉयल्स

विशेष कामगिरी : आयपीएलमध्येत शतक वेगवान शतक ठोकणारा भारतीय

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.