-
ऋजुता लुकतुके
मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) पराभव केल्यानंतर बंगळुरू संघात जल्लोषाचं वातावरण होतं. आणि मध्यरात्री नंतरही ड्रेसिंग रुममध्ये आनंद साजरा होत होता. लखनौने समोर ठेवलेल्या २२७ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूने ६ गडी आणि ८ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. गुणतालिकेतही १९ गुणांसह त्यांनी दुसरं स्थान पटकावलं. ड्रेसिंग रुममध्ये आनंद साजरा होत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संघातील एक युवा खेळाडू विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) सेल्फी काढण्यासाठी उत्सुक आहे. आणि विराट हसत हसत त्याला म्हणतोय, ‘या मुलानं माझं डोकं खराब केलं आहे,’ असा हा व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. (IPL 2025, RCB in Top 2)
संघातील २० वर्षीय युवा खेळाडू स्वस्तिक चिकारा (Swastik Chikara) विराटकडे फोटोसाठी आग्रह धरत आहे. विराटने कॅमेरासमोर पोझ तर दिली. पण, तो हसत हसत कॅमेराला उद्देशून म्हणतोय, ‘मुलाने छळ मांडला आहे.’ त्यानंतर चिकारा आलेला फोटो विराटला दाखवतो. आणि दोघं एकमेकांना आलिंगन देतात, असा हा व्हिडिओ आहे.
(हेही वाचा – Olympic 2036 Bid : २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी जर्मनीच्या बर्लिन शहराची अधिकृत दावेदारी )
Swastik chikara asking Kohli for photo
Virat : Dimag khata rhta hai hamesha 😂🤣 pic.twitter.com/STH0nIC5YR— RCBXTRA (@RCBXTRAOFFICIA) May 28, 2025
हा फोटो काढून झाल्यावर चिकारा म्हणतो, ‘विराट आमचा मोठा भाऊ आहे. आणि फोटोसाठी ते कधीही मना करत नाहीत.’ यावरून संघातील वातावरण आणि विजयानंतरच्या हलक्या क्षणांची कल्पना येते. विराट कोहलीने (Virat Kohli) या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आतापर्यंत १३ सामन्यांत त्याने ६० च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत. लखनौविरुद्घ देखील विराटने २९ चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे बंगळुरूला चांगली सुरुवात मिळाली. आणि सुरुवातीपासून बंगळुरूने षटकामागे १० ची धावगती राखली. (IPL 2025, RCB in Top 2)
एकूणच या हंगामात विराटने बंगळुरूसाठी ८ अर्धशतकं केली आहेत. आणि ऑरेंज कॅपच्या (Orange cap) शर्यतीतही तो चौथ्या स्थानावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community