Sunil Gavaskar : सुनील गावसकरांनी नवीन कर्णधार शुभमन गिलला काय इशारा दिला?

गिल इंग्लिश दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.

60
Sunil Gavaskar : सुनील गावसकरांनी नवीन कर्णधार शुभमन गिलला काय इशारा दिला?
Sunil Gavaskar : सुनील गावसकरांनी नवीन कर्णधार शुभमन गिलला काय इशारा दिला?
  • ऋजुता लुकतुके

आगामी इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. के एल राहुल (KL Rahul) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या संघातील ज्येष्ठ खेळाडूंना डावलून निवड समितीने शुभमन गिलवर (Shubman Gill) विश्वास दाखवला आहे. आणि आगामी इंग्लंड दौरा ही गिलसाठी खरी कसोटी असणार आहे. त्याचवेळी भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर(Sunil Gavaskar) यांनी शुभमन गिलला (Shubman Gill) एक इशारा दिला आहे. ‘खेळाडूंचा विश्वास आणि त्यांच्यावर हुकुमत त्याला मिळवावी लागेल. आणि या पदाबरोबर येणारं दडपण स्वीकारायला लागेल,’ असं गावसकर म्हणाले आहेत.

‘संघाचा एक सदस्य असणं आणि संघाचा कर्णधार असणं, यात खूप फरक आहे. कर्णधार झाल्यावर तुमच्यावरील दडपण वाढतं. तुम्ही संघाचे सदस्य असता तेव्हा तुमचं ज्यांच्याशी पटतं, त्यांच्याशीच तुम्ही चांगले संबंध ठेवले तरी चालतं. पण, कप्तान असलात की, सगळ्यांशी मिळून मिसळून राहावं लागतं. आणि कर्णधाराच्या कामगिरीपेक्षा त्याचं वर्तन जास्त महत्त्वाचं असतं,’ असं गावसकर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाले.

(हेही वाचा – Haryana Suicide Case : पंचकुलामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी केली आत्महत्या , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण)

शुभमन गिल (Shubman Gill) मागची ५ वर्षं भारतीय संघातून खेळतोय. आणि कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने ५ शतकं ठोकली आहेत. ३२ कसोटींत १,८९३ धावा त्याच्या नावावर आहेत. अलीकडेच माजी भारतीय कसोटीपटू योगराज सिंग (Yograj Singh) यांनी शुभमन गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं श्रेय युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि गिलच्या वडिलांना दिलं होतं. युवराज आणि शुभमन दोघंही पंजाबचे आहेत. आणि १९ वर्षांखालील वयोगटापासून युवराज सिंगने शुभमनला मार्गदर्शन केलं आहे.

गिल दीर्घकाळ भारतीय संघाची कप्तानी करू शकतो, असंही योगराज यांनी म्हटलं आहे. सध्या आयपीएलमध्ये गिल गुजरात टायटन्स(Gujarat Titans) या फ्रँचाईजीची कप्तानी करत आहे. आणि या संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाची कप्तानी करण्याची गिलची पहिलीच वेळ असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) उपकर्णधार होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.