-
ऋजुता लुकतुके
फलंदाज जर एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला तर त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं. क्रिकेटमधील हा अत्यंत दुर्मिळ बाद होण्याचा प्रकार आहे. बऱ्याचदा खेळपट्टीवर नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असताना धाव चोरण्याच्या प्रयत्नांत बाद होता, तेव्हा हा प्रकार घडतो. बदकाचं अंडं हे शून्याच्या आकाराचं लंबगोल असतं. त्यामुळे इंग्लंडमध्ये शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजाला ‘डकवर बाद’ झाला असं म्हणण्याची पद्घत सुरू झाली. त्यानंतर हळू हळू डकवर बाद होण्याचेही विविध प्रकार पुढे आले आहेत. (What is Diamond Duck)
(हेही वाचा – Anna University Case : चेन्नईतील १९ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांचा कारावास; वाचा संपूर्ण प्रकरण)
गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होणं, प्लॅटिनम डक म्हणजे डावाच्या पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणं. पण, डायमंड डक सगळ्यात वाईट, कारण इथं फलंदाजाने एकही चेंडू खेळलेला नसतो. क्रिकेटचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत तीनही क्रिकेटचे प्रकार मिळून एकूण १६४ खेळाडू डायमंड डकवर बाद झालेले आहेत. यातील १२ खेळाडू हे भारतीय होते. (What is Diamond Duck)
(हेही वाचा – Veer Savarkar : महाराष्ट्र शासनाचा ‘हा’ निर्णय तर स्वातंत्र्यवीरांच्या सैनिकीकरणाच्या नीतीचाच विजय)
अगदी किंग कोहलीही यातून गेला आहे. रॉजर बिन्नी हे डायमंड डकवर बाद होणारे भारताचे पहिले फलंदाज ठरले आहेत. त्यांच्याशिवाय हरभजन सिंग, झहीर खान (दोनदा), विराट कोहली, ॲबे कुरुविला, एमएसके प्रसाद, वेंकटपथी राजू, चेतन शर्मा, नवज्योत सिंग सिद्धू, एस श्रीसंत आणि जवागल श्रीनाथ हे खेळाडू डायमंड डकवर बाद झाले आहेत. यातील रॉजर बिन्नी, विराट कोहली आणि सिद्धू हे तिघेच निव्वल फलंदाज आहेत. त्यावरून डावाच्या शेवटी अशी हाराकिरी जास्त होते, हे लक्षात येऊ शकेल. (What is Diamond Duck)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community