“….मी अजूनही एक फॉरमॅट खेळत आहे”; रोहित शर्माच्या Wankhede Stadiumवरील स्टँडचं अनावरण

किक्रेटची पंढरी Wankhede Stadiumवर मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)द्वारे नवीन चार स्टँड्सचे शुक्रवार १६ मे २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आयसीसी अध्यक्ष शरद पवार, रोहित शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

31

किक्रेटची पंढरी Wankhede Stadiumवर मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)द्वारे नवीन चार स्टँड्सचे शुक्रवार १६ मे २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आयसीसी अध्यक्ष शरद पवार, रोहित शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शरद पवार, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार दिग्गज अजित वाडेकर यांच्या नावाने वानखेडेवर आता स्टँड्स दिसू लागणार आहेत. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले.

(हेही वाचा India Tour of England : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूही मध्यातच आयपीएल सोडणार? )

ते म्हणाले,  मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक उत्कृष्ट निर्णय घेतला आहे. ज्यांनी आम्हाला अभिमान दिला त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच, बीसीसीआयचे अध्यक्ष, एमसीएचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी क्रिकेटच्या विकासासाठी जे काम केले आहे त्यामुळे आज आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे. यात त्यांचे निश्चितच मोठे योगदान आहे. म्हणूनच Wankhede Stadiumवरील स्टँडला त्यांचे नाव देण्याचा एमसीएचा निर्णय योग्य आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Wankhede Stadiumवरील रोहित शर्माच्या स्टँडचे उद्घाटन झाल्यानंतर त्याचे नाव टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी आणि महान क्रिकेटपटूंमध्ये गणले जाईल. मागील वर्षात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. एकंदरीतच, ‘मुंबई चा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सन्मानित केले आहे.
आज जे घडत आहे, ते मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते –  रोहित शर्मा 
आज जे घडत आहे, ते मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते, असे उद्गार रोहित शर्माने स्टँड उद्घाटनावेळी बोलताना काढले. तो म्हणाला, लहानपणी मला मुंबईसाठी, भारतासाठी खेळायचे होते. क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंमध्ये माझे नाव असणे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी अजूनही खेळत असल्याने हे देखील खास आहे. मी दोन फॉरमॅटमधून निवृत्त झालो आहे, पण मी अजूनही एक फॉरमॅट खेळत आहे, असेही रोहित शर्मा यावेळी म्हणाला.
वानखेडे स्टेडियम आता आणखी आयकॉनिक झाले – सुर्यकुमार यादव 

 वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आता क्रिकेटर सुर्यकुमार यादवने खास पोस्ट करत रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनंदन रोहित शर्मा, क्रिकेटच्या मैदानावर अविश्वसनीय कामगिरी केल्याबद्दल. मॅच फिनिशरपासून ते सलामीवीर ते आमचा कर्णधार अशा प्रत्येक भूमिकेत तुम्ही प्रेरणा आणि आमचा अभिमान आहा,, असे तो म्हणाला. तसेच, आता वानखेडे स्टेडियम आणखी आयकॉनिक झाल्याचेही सुर्यकुमार यादवने पोस्टमध्ये म्हटले. Wankhede Stadium

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.