Virat Kohli 49th Centuries : ‘मी काही गोट नाही,’ विराटची विक्रमी ४९व्या शतकानंतर प्रतिक्रिया

शतकी खेळीपेक्षा आपल्या नम्रतेनं विराटने उपस्थितांची मनं जिंकली आहेत. ४९व्या शतकानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया काय होती पाहूया…

74
Virat Kohli : विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला तो क्षण
Virat Kohli : विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला तो क्षण

ऋजुता लुकतुके

किंग कोहलीने आपल्या ३५ व्या वाढदिवशी विक्रमी ४९ वं शतक (Virat Kohli 49th Centuries) करून चाहत्यांना आणि स्वत:लाही या दिवसाचं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं. त्याच्या या कामगिरीमुळे भारतानेही दक्षिण आफ्रिकेविरुद्‌ध मोठा विजय साकारला. १२१ चेंडूंत १०१ धावा करून नाबाद राहिलेला विराट स्वत: मात्र अगदी शांत होता.

सामनावीराचा पुरस्कार घेताना समालोचकाने त्याला विचारलं, ‘तू GOAT (ग्रेट ऑफ ऑल टाईम्स – सर्वकालीन सर्वात चांगला फलंदाज) आहेस का?’ यावर उत्तर देताना (Virat Kohli 49th Centuries) विराट एकदम लाजला. पण, लगेच म्हणाला, ‘मी असं काहीही नाहीए. संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलायला मला आवडतं.’

वस्तुस्थिती ही आहे की, विराट (Virat Kohli 49th Centuries) आधीपासूनच या खेळातील दिग्गजांच्या पंक्तीत होताच. आता एकेक विक्रम सर करताना पुन्हा एकदा त्याची तुलना सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, कुमार संगकारा यांच्याशी होतेय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मनसोक्त फटकेबाजी करू शकणारा आणि ५० षटकांत ३०० धावसंख्या पार करता येते याचा वस्तुपाठ घालून दिलेला दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स या सामन्यासाठी समालोचन कक्षात हजर होता.

(हेही वाचा – Kerala : गेल्या काही दशकांत केरळमधील हिंसाचारात वाढ)

सामन्यापूर्वी तो आवर्जून विराट कोहलीशी (Virat Kohli 49th Centuries) बोलला. दोघं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून एकत्रही खेळले आहेत. दोघांमध्ये आज चांगल्या गप्पा झाल्या. आणि डिव्हिलिअर्सने विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

सामन्या नंतर बोलताना (Virat Kohli 49th Centuries) विराटने श्रेयस अय्यरने दिलेल्या मोलाच्या साथीचा आवर्जून उल्लेख केला. ‘आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे आमच्याच मोठी भागिदारी होणं हे संघाच्या एकूण धावसंख्येला आकार देणारं ठरलं. १०व्या षटकानंतरच चेंडू वळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे श्रेयस आणि मी प्रत्येक चेंडूनंतर चर्चा करत होतो, रणनीती गरजेनुसार बदलत होतो. श्रेयसचे आभार मानावे तितके कमी आहेत,’ असं विराट म्हणाला.

वाढदिवसाच्या (Virat Kohli 49th Centuries) दिवशी शतक ठोकणं हा अनुभव सुखावणारा असल्याचं विराटला वाटतं. पण, त्याहून जास्त आनंद त्याला झाला ईडन गार्डन्स सारख्या खेळपट्टीवर शतक झळकावल्याचा.

‘खेळपट्टी बऱ्यापैकी संथ होती. तरी आम्ही ३०० च्या वर धावा केल्या. आणि मग गोलंदाजांनी सगळं कसब वापरून आफ्रिकन संघाला झटपट बाद केलं. संघाची कामगिरी सगळ्याच विभागात चांगली होतेय. आणि ही आनंदाची गोष्ट आहे,’ असं विराट म्हणाला.

भारतीय संघाचा शेवटचा साखळी सामना १२ नोव्हेंबरला नेदरलँड्स बरोबर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.