Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानावर खेळाडूंसाठी शीतपेयं घेऊन येतो

आशिया चषकात भारत वि बांगलादेश सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती

19
Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानावर खेळाडूंसाठी शीतपेयं घेऊन येतो

ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर जितका गंभीर असतो, तितकाच क्रिकेट खेळत नसताना तो इतर खेळाडूंची मस्करी आणि हास्यविनोद करताना दिसतो. शुक्रवारी श्रीलंकेच्या प्रेमदासा मैदानावर विराट कोहलीचं असंच रुप प्रेक्षकांना दिसलं. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विराटला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून त्याच्याकडे काम होतं मैदानावरील खेळाडूंसाठी शीतपेयं घेऊन जाण्याचं.

पहिल्याच विश्रांतीच्या वेळी विराटने (Virat Kohli) शीतपेयांच्या बॅगसह मैदानात अशी काही एंट्री घेतली की, टीव्ही कॅमेराचं आणि मैदानावर जमलेल्या प्रेक्षकांचं लक्षही त्याने वेधून घेतलं.

बारा सेकंदांच्या या व्हीडिओत विराट (Virat Kohli) असा काही धावत मैदानात घुसला, जसं काही त्याला आपल्या साथीदारांना भेटण्याची घाईच झाली होती. शिवाय तो धावताना हातवारेही करत होता. प्रेक्षकांचं मात्र त्यामुळे काही काळ मनोरंजन झालं.

(हेही वाचा – Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाची कपिल देवच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी)

तो (Virat Kohli) या सामन्यात खेळत नसल्यामुळे नाराज झालेले प्रेक्षक त्याला मैदानात बघून सुखावले. आशिया चषकातील सुपर ४ चा हा शेवटचा सामना आहे. पण, भारत आणि श्रीलंका या संघांनी अंतिम फेरीत आधीच मजल मारल्यामुळे हा सामना ही फक्त औपचारिकता आहे. म्हणूनच या सामन्यासाठी भारताने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी (Virat Kohli) करताना भारतासमोर ५० षटकांत २६७ धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशसाठी शकीब हसनने ८० तर तौहीद ह्रदयने ५४ धावा केल्या.

भारताने या सामन्यात (Virat Kohli) जसप्रीत बुमरा आणि महम्मद सिराज यांना विश्रांती दिली आहे. तर फलंदाजांमध्येही श्रेयस अय्यर हा सामनाही खेळत नाहीए. आणि तिलक वर्मा आणि सुर्यकुमार यादव यांना संधी मिळाली आहे. बांगलादेशच्या २६६ धावांचा पाठलाग करताना भारताचे सुरुवातीचे दोन फलंदाज दहा षटकांच्या आतच बाद झाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.