-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी-२० क्रिकेट का सोडलं याचं थेट उत्तर दिलं आहे. गेल्यावर्षी भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर ३६ वर्षीय विराटने अंतिम सामन्यानंतर तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. यंदा आयपीएलमध्ये १० सामन्यांत ४६५ धावा करून तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे. पण, मनगटात ताकद असतानाही तो आंतरराष्ट्रीय टी-२० पासून का दूर झाला हे सांगताना विराट म्हणतो, ‘नवीन खेळाडू माझी जागा घेण्यासाठी तयार आहेत आणि ते संधीची वाट बघतायत, हे पाहिल्यावरच मी निवृत्तीचा निर्णय घेतला.’
(हेही वाचा – पाकिस्तानच्या तुरुंगात सैन्य अधिकाऱ्याने Imran Khan यांच्यावर केला बलात्कार)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताज्या पॉडकास्टमध्ये विराटने (Virat Kohli) याविषयी भाष्य केलं आहे. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोहलीने महत्त्वपूर्ण ७६ धावा केल्या. त्याच्या योगदानामुळेच भारतीय संघ अडचणीतून सावरून समाधानकारक धावसंख्या उभी करू शकला. पण, अंतिम सामना संपल्या संपल्या त्याने पत्रकारांशी बोलताना निवृत्ती जाहीर केली. बक्षीस समारंभ संपल्यावर लगेचच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनीही आपल्या निवृत्तीची घोषणा केली. या कालखंडाकडे बघताना विराटने मनातील भावना पहिल्यांदा बोलून दाखवली आहे.
(हेही वाचा – Thackeray Vs Shinde : “शिवसेनेचे नवे बॅनर युद्ध!; ‘मैत्री वाघाशी’, शिवसेना उबाठावर थेट हल्ला”)
‘मी फारसा बदललोय असं नाही. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रुळायचं असेल तर तुम्हाला किमान दोन वर्षं लागतात, तेव्हा तुम्ही दडपणाचा सामना करायला शिकता. तो वेळ नवीन खेळाडूंना मिळून त्यांनी नवीन विश्वचषकासाठी तयार राहणं मला आवश्यक वाटलं. पुढील विश्वचषकापूर्वी नवीन खेळाडूंनी पुरेसे सामने खेळलेले असावेत, असं माझं मत होतं आणि त्यासाठी मी जागा रिकामी करून दिली,’ असं विराटने (Virat Kohli) स्पष्ट केलं. विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीत १२५ सामन्यांत ४,१८८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४८.६९ धावांची आहे. २०१४ आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकात तो मालिकावीर ठरला होता. सध्या तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याने आतापर्यंत १० सामन्यांत ४६५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ६८ धावांची आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community