Virat Kohli : विराट कोहलीने अखेर सांगितलं कप्तानी सोडण्याचं कारण

Virat Kohli : अपेक्षा आणि दडपण यामुळे विराटने घेतला तो कठीण निर्णय.

74
Virat Kohli : विराट कोहलीने अखेर सांगितलं कप्तानी सोडण्याचं कारण
  • ऋजुता लुकतुके

कसोटी क्रिकेटमध्ये ६० टक्के विजयाच्या टक्केवारीसह विराट कोहली (Virat Kohli) अजूनही भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. पण, २०१८ नंतर एक काळ असा होता, जेव्हा त्याच्या धावा होत नव्हत्या. भारतीय संघाची कामगिरीही त्याच्या मनासारखी होत नव्हती. त्या काळाविषयी विराट कोहलीने अलीकडे पहिल्यांदा उघडपणे भाष्य केलं आहे. ‘मानसिक शांती आणि आनंद यासाठी कप्तानी सोडण्याचा कठीण निर्णय घेतला,’ असं विराट म्हणतो.

(हेही वाचा – Operation Sindoor यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन)

विराटने (Virat Kohli) २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर टी-२० प्रकारातील कप्तानी सगळ्यात आधी सोडली. त्या पाठोपाठ त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचाईजीची कप्तानीही सोडली. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी पराभवानंतर २०२२ मध्ये विराटने कसोटी कर्णधारपदही सोडलं. त्या दिवसांबद्दल बंगळुरू फ्रँचाईजीच्या आरसीबी बोल्ड डायरीज या पॉडकास्टमध्ये बोलताना विराट म्हणतो, ‘एक क्षण असा आला की, माझ्या कारकीर्दीत बरंच काही घडत होतं. माझ्याकड़ून फलंदाज म्हणून खूप अपेक्षा होत्या आणि त्याचं दडपण एकेक्षणी अनावर झालं. त्यातून मी तो निर्णय घेतला.’

(हेही वाचा – Operation Sindoor : भारत-पाकिस्तान तणावामुळे विमान सेवा तात्पुरती बंद !)

विराटने (Virat Kohli) २०२२ मध्ये क्रिकेटमधून एका महिन्याची विश्रांतीही घेतली होती. आपल्याला खेळातील आनंद पुन्हा एकदा शोधायचा होता, असं त्याविषयी विराट म्हणतो. ‘मला क्रिकेटच खेळायचं आहे, हे मी ठरवलेलं होतं आणि तेच करायचं असेल तर खेळातून आनंद मिळवायला हवा होता. सतत माझी परीक्षा केली जाऊ नये असं मला वाटत होतं. म्हणून मी कप्तानीही सोडली आणि खेळातून विश्रांती घेतली,’ असं विराट म्हणाला. याच पॉडकास्टमध्ये विराटने भारतीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि तेव्हाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मदत केल्याचं नमूद केलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधीही या दोघांनी दिल्याचं त्याने आवर्जून सांगितलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.