Virat Kohli to Retire : विराट कोहलीचा निवृत्तीचा विचार ; बीसीसीआयची पुनर्विचाराची मागणी

इंग्लंड दौऱ्यापूर्वीच विराटला कसोटीतून निवृत्त व्हायचंय.

83
Virat Kohli to Retire? विराट कोहलीनेही बीसीसीआयकडे निवृत्तीचा विचार दाखवला बोलून, बीसीसीआयची पुनर्विचाराची मागणी
Virat Kohli to Retire? विराट कोहलीनेही बीसीसीआयकडे निवृत्तीचा विचार दाखवला बोलून, बीसीसीआयची पुनर्विचाराची मागणी
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्ती जाहीर करून जेमतेम २ दिवस झाले असताना आता विराट कोहलीनेही बीसीसीआयकडे (BCCI) निवृत्तीचा विचार बोलून दाखवल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच विराटला निवृत्ती घ्यायची आहे, अशी बातमी आहे. पण, बीसीसीआयने सध्या विराटला निवृत्तीच्या विचाराचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. ‘विराटने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आणि तसं बीसीसीआयला कळवलंही आहे. त्याला कसोटी क्रिकेटला (Test cricket) अलविदा करायचं आहे. पण, सध्या बीसीसीायने (BCCI) त्याला पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. यावर विराटने अजून उत्तर दिलेलं नाही,’ असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी काही वृत्तपत्रांशी बोलताना म्हटलं आहे. (Virat Kohli to Retire)

(हेही वाचा – Vedanta Share Price : मजबूत तिमाही निकाल आणि बोनस शेअरच्या घोषणेनंतर बाजारात चमकतोय हा शेअर)

येत्या काही दिवसांत इंग्लंड (England) दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. त्यापूर्वीच सध्याचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. आणि त्यापाठोपाठ संघातील आणखी एक ज्येष्ठ खेळाडू आता निवृत्तीच्या तयारीत असल्याचं दिसतंय. बोर्डर – गावसकर चषकातील (Border – Gavaskar Trophy) खराब कामगिरीनंतर विराट कोहलीच्या डोक्यात निवृत्तीचे विचार घोळत असल्याचं दिसतंय. कारण, अलीकडे अनेक मुलाखतींमधून विराटने तसं सुतोवाच केलं आहे. ‘मी निवृत्तीविषयी राहुल द्रविडशी (Rahul Dravid) सविस्तर बोललो आहे. माझ्यातील स्पर्धात्मक स्वभाव बघता, मला कधीच निवृत्त व्हायला आवडणार नाही, मी सतत नवीन उद्दिष्टं आखत राहीन, अशी भीती त्याने बोलून दाखवली होती. तेव्हापासून मी काही गोष्टी स्वीकारायला शिकलो. आता माझ्यातील ऊर्जा, क्रिकेट खेळत राहण्याची इच्छा यांचा आढावा घेत मी योग्य वेळी निर्णय घेईन,’ असं आरसीबीच्या (RCB) पॉडकास्टमध्ये विराट म्हणाला होता. (Virat Kohli to Retire)

(हेही वाचा – BMC : बनावट नकाशाच्या आधारे अनधिकृतरित्या बांधकामे, ०९ तोडली, १३० रडारवर )

पण, सध्या बीसीसीआयसमोर (BCCI) त्यामुळे समस्या उभी राहिली आहे. रोहित पाठोपाठ विराटही इंग्लंड दौऱ्यावर गेला नाही तर संघात यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, श्रेयस अय्यर यांच्यावरच फलंदाजीची मदार असेल. आणि आघाडीची तसंच मधली फळीही अननुभवी असेल. शिवाय बुमराहही पूर्ण ५ कसोटी खेळण्याची शक्यता कमीच आहे. अशावेळी भारताची फलंदाजी नक्कीच कमकुवत होणार आहे. तर नेतृत्वासाठीही अनुभवी खेळाडू संघाबरोबर असणार नाही. भारतीय संघाचे नेतृत्व तरुण खेळाडूकडे सोपवण्याचा निवड समिती आणि बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून शुभमन गिलचा (Shubman Gill) विचार होत आहे. पण, विराटही इंग्लंड दौऱ्यावर गेला नाही तर कर्णधाराला अनुभवी खेळाडूची साथ मिळणार नाही, ही काळजी बीसीसीआयला वाटतेय. (Virat Kohli to Retire)

३६ वर्षीय विराट भारतासाठी १२३ कसोटी खेळला आहे. यात त्याने ४६.८५ धावांच्या सरासरीने ९,२३० धावा केल्या आहेत. मागच्या पाच वर्षांत विराटची कामगिरी घसरल्यामुळे त्याची सरासरी कमी झाली. या वर्षांत त्याने ३७ कसोटींत फक्त १,९९० धावा केल्या आहेत. सलग पाच वर्षांच्या अपयशामुळे विराट आपल्या भवितव्यावर विचार करू लागला आहे. (Virat Kohli to Retire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.