Virat Kohli Retires : विराटने निवृत्तीपूर्वी रवी शास्त्री यांच्याशी काय चर्चा केली होती?

Virat Kohli Retires : सात दिवस आधी विराटने शास्त्री यांच्याशी मन मोकळं केलं होतं. 

50
Virat Kohli Retires : विराटने निवृत्तीपूर्वी रवी शास्त्री यांच्याशी काय चर्चा केली होती?
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबत भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा खुलासा केला आहे. विराट कोहलीनं निवृत्ती घेण्याअगोदर चर्चा केली होती असं ते म्हणाले. रवी शास्त्रींनी आयसीसी रिव्यूमध्ये संजना गणेशनसोबबत चर्चा केली. (Virat Kohli Retires)

रवी शास्त्री संजना गणेशन सोबत बोलताना म्हणाले की, विराट कोहलीनं निवृत्ती घेण्यापूर्वी सात दिवस अगोदर चर्चा केली होती. विराटकडे त्याच्या निर्णयाबाबत स्पष्टता होती. कसोटी क्रिकेटसाठी जे शक्य होतं ते सर्व केलंय अशी विराटची भावना होती. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कसोटीमधील सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं त्यापैकी ४० सामन्यात संघाला विजय मिळाला होता. यानंतर दुसऱ्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी आहे. (Virat Kohli Retires)

(हेही वाचा – Mumbai Police दलात मोठे बदल; आता गुप्तचर विभागाला मिळणार नवे नेतृत्व!)

रवी शास्त्री विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत म्हणाले, त्यानं सांगितलं की, मला पश्चाताप होत नाही. शास्त्री पुढे म्हणाले त्याला एक दोन खासगी प्रश्न विचारले, त्यावर त्यानं स्पष्ट म्हटलं की माझ्या मनात कोणताही संशय नाही. शास्त्री म्हणाले की मला वाटतं हा योग्य वेळ होता. विराट कोहलीच्या मनानं त्याच्या शरीराला वाटलं की आता इथून जाण्याची योग्य वेळ आहे. रवी शास्त्री पुढं म्हणाले की, विराट कोहलीनं जर एखादी गोष्ट ठरवली तर तो त्यासाठी १०० टक्के योगदान देतो. ज्याची बरोबरी करणं कोणत्याही फलंदाज किंवा गोलंदाजाला करता येणार नाही. (Virat Kohli Retires)

शास्त्री पुढे असंही म्हणाले की, विराट मैदानात उतरला की, तो आपले १०० टक्के देतो. त्याला फलंदाजी करायची असते. त्याला ११ च्या ११ झेल टिपायचे असतात. तसंच त्याला निर्णयही घ्यायचे असतात. त्यामुळे तो सामन्यात आपली खूप सारी ऊर्जा देत असतो. विराट भारतीय संघाचा कर्णधार असताना रवी शास्त्री संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. खासकरून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील संस्मरणीय विजय या जोडीने एकत्र मिळवले आहेत. (Virat Kohli Retires)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.