Virat Kohli Retirement : ३३ वर्ष विराट, सचिनने सांभाळलेली क्रमांक ४ ची जागा आता कोण घेणार?

Virat Kohli Retirement : गंभीर, आगरकर जोडीला हेच उत्तर आता शोधायचं आहे.

51
Virat Kohli Retirement : ३३ वर्ष विराट, सचिनने सांभाळलेली क्रमांक ४ ची जागा आता कोण घेणार?
  • ऋजुता लुकतुके

१९९२ मध्ये सचिन रमेश तेंडुलकरने भारतीय कसोटी संघात चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. त्यापूर्वी मोहम्मद अझरुद्दिन या जागेवर काही काळ खेळत होता. पण, त्यानंतर मात्र कसोटी क्रमवारीतील ही महत्त्वाची जागा सचिनने पुढील २१ वर्षं सांभाळली. भारतीय क्रिकेटची सेवा केली आणि तो निवृत्त झाल्यावर आपसूकच ती जागा २०१३ साली विराटला मिळाली. भारतीय क्रिकेटचे हे खंदे वीर, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाचं महत्त्व वाढवलं. (Virat Kohli Retirement)

सचिन ते विराट हे स्थित्यंतर भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत सुरळीत झालं. तिथून पुढे ३३ वर्षं ही परंपरा कायम राहिली. सचिनकडून विराटकडे चौथ्या क्रमांकाची धुरा अलगद गेली. पण, आता विराट निवृत्त झाल्यावर मात्र भारतीय कसोटी संघातील चौथ्या क्रमांकाची जागा रिक्त झाली आहे. सचिन तेंडुलकरने चौथ्या क्रमांकावरून १४४ कसोटी खेळल्या आणि यात त्याने ४४ शतकांसह १३,४९२ धावा केल्या. तर विराटने १६० डावांमध्ये ७,५६४ धावा केल्या त्या ५० धावांच्या सरासरीने. त्याने २६ कसोटी शतकं ठोकली. (Virat Kohli Retirement)

(हेही वाचा – Metro विस्ताराला केंद्राचे पूर्ण सहकार्य; राज्यात कुठे आणि कसा होणार विकास ?)

विराटच्या अनुपस्थितीत आता शुभमन गिल, के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांची नावं आघाडीवर आहेत. यशस्वी आणि शुभमन ही जोडी आघाडीला खेळू शकते. पण, शुभमन गिलने यापूर्वी आघाडीला खेळण्यास फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर यशस्वी जयस्वालच्या साथीने साई सुदर्शन सलामीला येऊ शकतो. पण, त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यात स्पर्धा असणार आहे. (Virat Kohli Retirement)

दोघांमध्ये राहुल सगळ्यात अनुभवी आहे. तर श्रेयस अय्यर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मुंबईकर सर्फराझ खान मोठ्या दुखापतीतून नुकता बाहेर आल्यामुळे सध्या तो या स्पर्धेत नाही. शिवाय करुण नायरला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. पण, तो चौथ्या क्रमांकावर लगेच खेळेल असं नाही. त्यामुळे श्रेयस आणि राहुल हेच दोन आघाडीचे पर्याय आहेत. त्यातून एक पर्याय गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांना निवडायचा आहे. राहुलने आतापर्यंत ५७ कसोटी सामन्यांत ३,२५२ धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यर फक्त १४ कसोटी खेळला आहे. यात त्याने ८११ धावा केल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यात दोघांची परीक्षाही होईल आणि दौऱ्यात तावून सुलाखून निघालेला खेळाडू या जागेवर विराजमान होईल. (Virat Kohli Retirement)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.