-
ऋजुता लुकतुके
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह वृंदावन धाम इथं गेला होता. दोघं प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत. विराट आणि अनुष्का आध्यात्मिक विचारांचे आहेत आणि वर्षातून काही वेळा ते प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट देतात. अलीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघण्यापूर्वीही विराट पत्नी अनुष्का तसंच आपल्या दोन मुलांसह आश्रमात आला होता. आता आश्रमात प्रेमचंद महाराजांचं दर्शन घेतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे आणि यात महाराज विराटशी निवृत्तीविषयी संवाद साधताना दिसतात. त्यातून विराटची मानसिकताही समजून येते. (Virat Kohli Retirement)
विराटने सोमवारी दुपारी कसोटीतून निवृत्तीचा भावनिक निर्णय जाहीर केला. महाराजांनी विराटला काही प्रश्न विचारले. आणि त्यांची विराटने प्रसन्नपणे उत्तरं दिली. ‘तू आनंदी आहेस ना?’ असं विचारताच विराट म्हणतो, ‘हो नक्कीच.’ विराट यावेळी शांत दिसतो आणि निवृत्तीच्या त्याने स्वीकारल्याचंही स्पष्टपणे दिसतं. (Virat Kohli Retirement)
(हेही वाचा – Accident News : मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलीन ब्रिजला धडकले; अनेकजण जखमी, Video Viral)
Premanand Maharaj – ‘Prasann ho?’
Virat Kohli – ‘Ji Guru ji’ pic.twitter.com/TC2Rf8z17n
— Prayag (@theprayagtiwari) May 13, 2025
कोहलीचा निवृत्तीनंतरचा हा पहिलाच संवाद लोकांसमोर आला आहे. विमानतळावर त्याने कुणाशीही बोलणं टाळलं होतं. १४ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत १२३ कसोटींत ९,२३० धावा त्याच्या नावावर आहेत. यात ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं त्याने केली आहेत. २०२० पासून विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत थोडा उतार आला आणि या कालावधीत त्याने फक्त ३ कसोटी शतकं केली आहेत. ऑस्ट्रेलियातील बोर्डर – गावस्कर मालिकेत पहिल्या पर्थ कसोटीतील शतक वगळलं तर विराटसाठी ही मालिकाही सर्वसाधारण गेली होती. त्यामुळे विराटच्या निवृत्तीची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती. पण, त्याचवेळी त्याची तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मकता पाहता तो इतक्यात हार मानणार नाही, अशीही लोकांची अटकळ होती. (Virat Kohli Retirement)
अलीकडे त्याचा फॉर्म चांगला नसला तरी त्याची व्यावसायिकता, तंदुरुस्ती आणि खेळाप्रती समर्पण भावना यांचं नेहमीच कौतुक झालं. विराट इथून पुढे एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे. शिवाय तो भारत सोडून लंडन किंवा दुबईत स्थायिक होण्याची शक्यताही बोलली जात आहे. (Virat Kohli Retirement)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community