-
ऋजुता लुकतुके
सोमवारी कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर मंगळवारी विराट वृंदावन धाम इथं आले आध्यात्मिक गुरू प्रेमचंद महाराजांच्या भेटीला गेला. मुंबई विमानतळावर विराट आणि पत्नी अनुष्काची गाठ काही पत्रकारांशी पडली. सगळ्यांनी विराटकडे फोटो काढण्याची इच्छा प्रदर्शित केली. पण, विराटने वेळेअभावी ते शक्य नसल्याचं सांगत तिथून काढता पाय घेतला. पण, त्याला पाहून तिथे जमलेल्या चाहत्यांनी विराटला खेळत राहण्याचा प्रेमळ आग्रह केला. (Virat Kohli Retirement)
‘सर, तुम्ही हे चुकीचं केलंत. निवृत्ती का घेतलीत? आता आम्ही इथून पुढे कधीही क्रिकेट पाहणार नाही,’ असं चाहते विराटला म्हणाले. तेव्हा विराटने फक्त स्मितहास्य केलं. ‘मी फक्त तुमच्यासाठी कसोटी क्रिकेट पाहत होतो,’ असं आणखी एक चाहता म्हणाला. एका चाहत्याने विराटला फोटोसाठी विनंती केली. ‘आता वेळ खूपच कमी आहे. पुढच्या वेळी नक्की फोटो काढू,’ असं म्हणत विराट तिथून निसटला. (Virat Kohli Retirement)
(हेही वाचा – Virat Kohli Retirement : विराट कोहलीचा निवृत्तीनंतरचा पहिला व्हिडिओ समोर)
Virat Kohli and Anushka Sharma at Mumbai Airport ✈️
– Paps to Virat : Virat sir why did you take retirement? We will not see cricket any more! 💔 pic.twitter.com/rXY8k4iqN4
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) May 13, 2025
एक चाहता विराटचा पाठलाग करत राहिला आणि तो म्हणत होता, ‘आम्ही तुमची वाट बघू. आता आम्ही फक्त एकदिवसीय क्रिकेटच पाहणार,’ असं हा चाहता ओरडत राहिला. काहींनी तर आयपीएलमध्ये बंगळुरूच जिंकणार अशी गर्जनाही केली. विराटने त्यांना फक्त अंगठा उंचवून दाखवला आणि तो शांतपणे तिथून निघून गेला. मंगळवारी विराट मुंबईहून वृंदावन इथं प्रेमानंद गोविंद शरनजी यांच्या आश्रमात गेला. तिथे तो आणि पत्नी अनुष्का यांनी साधारणपणे तीन तास घालवले. (Virat Kohli Retirement)
याच वर्षी तिसऱ्यांदा विराट या आश्रमात दर्शनासाठी आला आहे. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून आल्यावर १० जानेवारीलाही विराट इथं आला होता. विराटने आता टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे. (Virat Kohli Retirement)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community