Virat Kohli On IPL : विराट कोहलीने सांगितलं, आयपीएलच्या लोकप्रियतेचं रहस्य 

Virat Kohli on IPL : खेळाडू आणि चाहत्यांमधील जवळीकीमुळे आयपीएलची लोकप्रियता वाढल्याचं विराट कोहलीला वाटतं

112
IPL 2024, Virat Kohli : क्रिकेटपासून दूर असताना विराटने क्रिकेटसाठी ‘हे’ केलं
IPL 2024, Virat Kohli : क्रिकेटपासून दूर असताना विराटने क्रिकेटसाठी ‘हे’ केलं
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल (IPL) लीग आपल्याला खूप आवडत असल्याचं स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli ) अलीकडे एका मुलाखतीत जाहीर केलं आहे. आणि खेळाडू तसंच चाहते या लीगमुळे एकत्र आले आहेत, हेच या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं रहस्य आहे, असं मतही व्यक्त केलं आहे. विराट सध्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळत नाहीए. पण, या ताज्या मुलाखतीमुळे तो आयपीएलमध्ये खेळणार असल्याची शक्यता वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा पहिला सामना २२ मार्चला चेन्नई सुपरकिंग्जशी होणार आहे. (Virat Kohli On IPL)

(हेही वाचा- Sachin Praises Amir Lone : ‘हाच खरा लेगस्पिनर आहे,’ असं सचिन कुणाबद्दल म्हणाला?)

‘मला आयपीएल आणखी एका कारणासाठी आवडते. तुम्ही खूप वर्षं ज्यांचा खेळ पाहिला आहे, अशा खेळाडूंबरोबर तुम्ही खूप वेळ घालवू शकता. ड्रेसिंग रुममध्ये सगळ्या देशांचे खेळाडू एकत्र येतात. ज्या खेळाडूंना तुम्ही पूर्वी पाहिलेलं नसतं, असे खेळाडूही एकत्र येतात. आणि ही या स्पर्धेची खरी मजा आहे,’ असं विराटने स्टार स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवलं. (Virat Kohli On IPL)

आयसीसीच्या स्पर्धा अधून मधून होतात. या स्पर्धांमध्ये विविध देशांचे खेळाडू एकत्र येतात. पण, तिथे खेळाडू राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करत असतो. आयसीसी स्पर्धांमध्ये खेळाडूंत तितकीशी देवाण घेवाण होत नाही, असं विराटला वाटतं. ‘आयपीएलमध्ये तुम्ही संघांना २-३ दिवसांत पुन्हा एकदा भेटता, मोठा फॉरमॅट असल्यामुळे हे होतं. आणि या फॉरमॅटमुळेच स्पर्धेची रंगत वाढते. खेळाडू एकत्र येतात. वेगवेगळ्या शहरांत, वेगवेगळ्या खेळाडूंसमोर आणि दरवेळी वेगळ्या वातावरणात तुम्ही क्रिकेट खेळता. खेळाडूंसाठी हे आव्हानात्मक आहे,’ असं शेवटी विराटने बोलून दाखवलं आहे. (Virat Kohli On IPL)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे काही उमेदवार बदलण्याचा भाजपा वरिष्ठांचा शिंदेंना सल्ला)

या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे आयपीएलमध्ये जादूई खेळी साकारतात आणि खेळाडूंमधील विजिगिषू वृत्ती बाहेर येते, असं विराटला वाटतं. (Virat Kohli On IPL)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.