-
ऋजुता लुकतुके
भारताचा अनुभवी तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने केलेल्या प्रगतीसाठी माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) श्रेय देऊ केलं आहे. संघात विजयी मानसिकता आणि विजिगिषू वृत्ती जागी करण्यात विराटची भूमिका मोठी होती, असं त्याचं म्हणणं आहे. भुवनेश्वर विराटबरोबर सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात एकत्र खेळतोय. आणि या फ्रँचाईजीने आयोजित केलेल्या एका पॉडकास्टमध्ये भुवनेश्वरने विराटच्या कप्तानीबद्दल आपलं मन मोकळं केलं आहे.
‘परदेशात विजयाची मानसिकता विराटने निर्माण केली. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी भारतीय संघात तेज गोलंदाजांची पाठराखण त्याने केली,’ असं भुवनेश्वर (Bhuvneshwar Kumar) म्हणाला. पुढे तो म्हणतो, ‘विराटचा दृष्टिकोणच वेगळा आहे. जगात कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत जिंकलं पाहिजे, हा निर्धारच मूळात विराटने संघात जागवला. त्यासाठी तेज गोलंदाजांना नेहमी पाठिंबा दिला. आणि संघाची मानसिकताच बदलली.’
𝐈𝐧𝐝𝐢𝐚’𝐬 𝐏𝐚𝐜𝐞 𝐁𝐨𝐰𝐥𝐢𝐧𝐠 𝐑𝐞𝐯𝐨𝐥𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐟𝐞𝐚𝐭𝐮𝐫𝐢𝐧𝐠 𝐁𝐡𝐮𝐯𝐧𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐊𝐮𝐦𝐚𝐫 ☄
Swing King Bhuvi opens up on his journey to becoming one of India’s finest pacers – the importance of backing instincts, being proactive, staying one step ahead of… pic.twitter.com/PdhlTEtbWV
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 7, 2025
(हेही वाचा – IPL 2025, MI vs PBKS : ऑपरेशन सिंदूरचा असाही परिणाम; मुंबई विरुद्ध पंजाब सामना धरमशालातून हलवण्याची शक्यता)
२०२२ साली भुवनेश्वर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. पण, २०१० च्या दशकात तो भारताचा मुख्य गोलंदाज होता. तेज गोलंदाजाला दुखापती चुकत नाहीत. तेच भुवनेश्वरच्या बाबती झालं. आणि २०१६ तसंच २०१९ चा विश्वचषक (World Cup) तो दुखापतींमुळे खेळू शकला नाही. पण, भुवनेश्वरला त्याचं दु:ख नाही. ‘मी उद्दिष्ट समोर ठेवून त्यावर काम करत नाही. तर प्रत्येक सामना माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. मी तेवढाच विचार करतो. आणि मग पुढील सामन्याचा विचार करतो. त्यामुळे मानसिक संतुलन आणि शांतता राखायला मदत होते. आताही मी फक्त आयपीएलचा (IPL) विचार करतोय,’ असं भुवनेश्वर म्हणाला.
३५ वर्षीय भुवनेश्वर आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. यंदाही आयपीएलमध्ये त्याने १० सामन्यांत महत्त्वाचे १२ बळी मिळवले आहेत. जोस हेझलवूडच्या साथीने त्याने बंगळुरूच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलला आहे. २०१२ मध्ये भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या भुवनेश्वरने तीनही प्रकारात मिळून एकूण २९४ आंतररा्ष्ट्रीय बळी मिळवले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community