Virat-Anushka ने घेतलं अयोध्येतील राम मंदिर, हनुमान गढी मंदिरात दर्शन !

Virat-Anushka ने घेतलं अयोध्येतील राम मंदिर, हनुमान गढी मंदिरात दर्शन !

74
Virat-Anushka ने घेतलं अयोध्येतील राम मंदिर, हनुमान गढी मंदिरात दर्शन !
Virat-Anushka ने घेतलं अयोध्येतील राम मंदिर, हनुमान गढी मंदिरात दर्शन !

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat-Anushka ) हे दोघेही अध्यात्माकडे वळले आहेत. ते बहुतेक वेळ देवाच्या भक्तीत घालवत आहेत. कधी कृष्ण दास यांच्या कीर्तन भजनात दंग झालेले पाहायला मिळालेत. तर कधी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दिसून आलेत. आता नुकतंच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे अयोध्येत पोहोचले. या ठिकाणी त्यांनी हनुमान गढी मंदिराला भेट दिली आणि राम मंदिरात दर्शन घेतलं. (Virat-Anushka )

हेही वाचा-By-elections : चार राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर !

विराट आणि अनुष्काचा अयोध्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट हे हनुमान गढी मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. तिने डोक्यावर ओढणी घेत बजरंगबलीचं दर्शन घेतलं. तर विराट कोहली हा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसला. यावेळी दोघेही देवाच्या भक्तीत मग्न असल्याचं दिसून आले. मंदिर प्रशासनाकडून दोघांच्याही गळ्यामध्ये हार घालण्यात आले. (Virat-Anushka )

हेही वाचा- Delhi Rain : मुसळधार पावसाने एसीपी ऑफिसचं छत कोसळलं ; ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

दोघांनीही २० मिनिटे हनुमान गढी येथे दर्शन आणि पूजा केली. यानंतर ते राम मंदिरात पोहोचले आणि रामलल्लाचं दर्शन घेतलं. अर्धा तास मंदिर परिसरात थांबल्यानंतर दोघेही लखनऊला रवाना झाले.यावेळी विराट आणि अनुष्काला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. इतकी प्रसिद्धी आणि यश मिळवूनही, देवावरील या दोघांच्या दृढ विश्वासाचं अनेकांनी कौतुक केले आहे. (Virat-Anushka )

हेही वाचा- Donald Trump यांचा ॲपलनंतर सॅमसंगला इशारा !

काही दिवसांपूर्वीच १३ मेला विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती घेतल्याच्या एक दिवसानंतर, विराट आणि अनुष्का वृंदावनला पोहोचले. दोघांनीही प्रेमानंद महाराजांना नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रेमानंद महाराजांशी बोलताना विराट आणि अनुष्का भावुक झालेले दिसले होते. दोघांनीही महाराजांशी सुमारे ७ मिनिटे खाजगी संभाषण केलं होतं. (Virat-Anushka )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.