Vinod Kambli : विनोद कांबळीला सुनील गावस्कर यांची फाऊंडेशन देणार महिन्याला ३०,००० रुपये

Vinod Kambli : जानेवारी महिन्यात गावस्कर यांनी कांबळीला मदतीची घोषणा केली होती.

93
Vinod Kambli : विनोद कांबळीला सुनील गावस्कर यांची फाऊंडेशन देणार महिन्याला ३०,००० रुपये
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) अलीकडेच आर्थिक अडचणी आणि आजारपणामुळे चर्चेत आला होता. भारतासाठी १०४ एकदिवसीय आणि १७ कसोटी सामने खेळणारा आणि महान सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र असलेला कांबळी अनेक आजारांशी झुंजत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांबळीला स्नायू दुखावल्यामुळे तसंच मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे वानखेडे स्टेडिअमवर स्टँड; अजित वाडेकर, शरद पवार यांचंही स्टँडला नाव)

या कठीण काळात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी कांबळीला पाठिंबा दिला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईतील शिवाजी पार्क येथे दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले तेव्हा गावस्कर यांनी कांबळीला (Vinod Kambli) मदत करण्याचे आश्वासन दिले होते. ताज्या बातमीनुसार, गावस्कर यांनी आपला शब्द पाळताना कांबळीला दरमहा मदत करायचं ठरवलं आहे.

(हेही वाचा – WhatsApp Status ची लिमिट वाढली ; आता ६० सेकंदांऐवजी …)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावस्कर यांचे चॅम्प्स फाउंडेशन कांबळीला वैद्यकीय मदतीसाठी दरवर्षी ३०,००० रुपये देणार आहे. याशिवाय बीसीसीआयकडूनही कांबळीला माजी खेळाडूंना दिला जाणारा भत्ता दरमहा देण्यात येतो. गावस्कर आणि कांबळी जानेवारीमध्ये वानखेडे स्टेडियमवर ५० व्या वर्धापन दिनानिमित्त भेटले होते. कांबळीची (Vinod Kambli) पत्नी अँड्रिया हेविट यांनी जानेवारीच्या सुरुवातीला खुलासा केला होता की तिने आधी २०२३ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता परंतु तिच्या पतीची “असहाय्य अवस्था” पाहिल्यानंतर तिने तिचा विचार बदलला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.