Vijay Hazare Trophy : विजय हजारे चषकाच्या अंतिम फेरीत राजस्थान वि. हरयाणा

विजय हजारे चषकाचे दोन्ही उपान्त्य फेरीचे सामने मोठ्या धावसंख्येचे झाले 

139
Vijay Hazare Trophy : विजय हजारे चषकाच्या अंतिम फेरीत राजस्थान वि. हरयाणा
Vijay Hazare Trophy : विजय हजारे चषकाच्या अंतिम फेरीत राजस्थान वि. हरयाणा

ऋजुता लुकतुके

विजय हजारे चषकाचे उपान्त्य फेरीचे दोन्ही सामने मोठ्या धावसंख्येचे आणि रंगतदार झाले. शेवटी राजस्थानने कर्नाटकचा ६ गडी राखून तर हरयाणाने (Vijay Hazare Trophy) तामिळनाडूचा ६३ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. राजस्थानचा विजय उतार चढावांनी भरलेला होता.

कर्नाटकने पहिली फलंदाजी करताना ८ गडी गमावत २८२ धावा केल्या. यात सहाव्या क्रमांकाच्या अभिनव मनोहरने ८० चेंडूंत ९१ धावा केल्या. त्यापूर्वी कर्नाटकची सुरुवात साधारण झाली होती आणि पहिले चार गडी त्यांनी ८७ धावांतच गमावले होते. पण, त्यानंतर मनोहरला श्रीजीत (३८) आणि मनिष पांडे (२८) यांनी चांगली साथ दिली. तर मनिष भानगडेनं ६३ धावा करत कर्नाटकला २८२ धावांचा टप्पा गाठून दिला.

या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था ३ बाद २३ अशी झाली होती. पण, कर्णधार दीपक हुडाने अविश्वसनीय खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने १२८ चेंडूंत १८० धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्यामुळेच राजस्थानचा विजय शक्य झाला. त्याने करण लांबाबरोबर २५४ धावांची भागिदारी केली.

दुसऱ्या सामन्यात हरयाणाने तामिळनाडूचा ६३ धावांनी पराभव केला. हा सामना बाबा इंद्रजीतने गाजवला. तामिळनाडूला विजयासाठी २९४ धावा हव्या होत्या. पण, त्यांची अवस्था ३ बाद ५३ अशी बिकट असताना बाबा अपराजित तोंडावर पट्टी बांधून मैदानात उतरला. त्याचे ओठ चक्क फाटले होते. त्यामुळे नाकाच्या खाली पूर्ण पट्टी होती. तरीही तो संघासाठी फलंदाजीला आला. आणि त्याने ६४ धावाही केल्या.

पण त्याची लढत अपुरी ठरली. दिनेश कार्तिक (३१) आणि साई किशोर (२८) यांचा अपवाद वगळता कुणी मोठी धावसंख्या रचू शकलं नाही. आणि हरयाणाता ६३ धावांनी विजय झाला. त्यापूर्वी हरयाणा संघाने २९३ धावा केल्या त्या राणाच्या ११६ धावांच्या जोरावर. त्याला एसपी कुमारने ४८ धावा करत चांगली साथ दिली.

आता अंतिम सामना येत्या शनिवारी राजस्थान आणि हरयाणा दरम्यान होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.