
-
ऋजुता लुकतुके
सातवेळा ग्रँडस्लॅम विजेती व्हिनस विल्यम्स (Venus Williams) ४४ व्या वर्षी व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करणार आहे. इंडियाना वेल्स स्पर्धेत तिला वाईल्डकार्ड प्रवेश मिळाला आहे. मार्च २०२४ मध्ये ती मियामी खुल्या स्पर्धेतही खेळली होती. तिथे पहिल्या फेरीत बाद झाल्यानंतर गेल्या वर्षीही ती इंडियाना वेल्स स्पर्धेत खेळली होती आणि तिथेही तिचा पहिल्या फेरीत पराभव झाला. त्यानंतर पहिल्यांदा ती व्यावसायिक टेनिसमध्ये खेळणार आहे.
BREAKING:
Venus Williams has been given a wildcard to play Indian Wells.
44 years old… 7 Grand Slam Singles titles.
Great news for tennis.
Icon. Legend. Queen V.
🇺🇸❤️ pic.twitter.com/VJv3rtvL8h
— The Tennis Letter (@TheTennisLetter) February 19, 2025
२००० च्या दशकात व्हिनसचा व्यावसायिक टेनिसमध्ये दबदबा होता आणि यात ५ विम्बल्डन तर २ युएस ओपन विजेतेपदं आहेत. याशिवाय आपली बहीण सेरेना विल्यम्ससह तिने १४ दुहेरी विजेतेपदं पटकावली आहेत. फक्त व्हिनसच नाही तर तिच्या काळातील आणखी एक टेनिसपटू पेट्रा क्विटोवाही इंडियाना वेल्समध्ये खेळताना दिसणार आहे. क्विटोवा आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी १५ महिने टेनिसपासून दूर होती. (Venus Williams)
(हेही वाचा – “मुंबईतील ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानांच्या भाडेपट्टा नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे” – DCM Ajit Pawar)
बीएनपी पारिबास इंडियाना वेल्स स्पर्धा ही डब्ल्यूटीओ मालिकेतील महत्त्वाची आणि प्रतीष्ठेची स्पर्धा आहे आणि २ मार्च ते १६ मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. व्हिनस (Venus Williams) आणि क्विटोवाच्या बरोबरीने जो फोन्सेका, लर्नर टीन या आणखी दोन १५ वर्षीय मुलींना वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community