K L Rahul : अव्वल फलंदाज के एल राहुल आशिया चषकासाठी उपलब्ध होणार?

फलंदाज लोकेश राहुल आता मांडीच्या दुखापतीतून सावरला

107
K L Rahul : अव्वल फलंदाज के एल राहुल आशिया चषकासाठी उपलब्ध होणार?
K L Rahul : अव्वल फलंदाज के एल राहुल आशिया चषकासाठी उपलब्ध होणार?

ऋजुता लुकतुके

मधल्या फळीतला यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल आता मांडीच्या दुखापतीतून सावरलाय. आणि त्यामुळे आगामी आशिया चषकासाठी तो संघाचे दरवाजे ठोठावणार आहे. वेस्ट इंडिज (India’s Tour of West Indies) मधली एकदिवसीय (ODI) आणि टी-ट्वेंटी (T20) मालिका संपल्यावर भारतीय टीम आयर्लंडचा (Ireland) छोटेखानी दौरा करेल. पण, त्यानंतर संघासमोर पहिलं महत्त्वाचं आव्हान आहे ते आशिया चषकाचं. (Asia Cup) आणि या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी एक खूशखबर आहे.

जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि प्रसिध कृष्णानंतर (Prasidh Krishna) आता मधल्या फळीतला अनुभवी महत्त्वाचा फलंदाज के एल राहुलही दुखापतीतून सावरला आहे. प्रसिध आणि बुमरा आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहेत. आता पाठोपाठ आशिया चषकासाठी राहुलही संघाचे दरवाजे ठोठावत आहे. आपण दुखापतीतून पूर्णपणे सावरले असून फलंदाजी (Batting) आणि यष्टीरक्षणाचा (Wicket keeping) नियमित सराव सुरू केला असल्याचं खुद्द राहुलने एका ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. तर बीसीसीआयही त्याच्या तंदुरुस्तीबद्दल समाधानी असल्याचं समजतंय. के एल राहुलच्या उपलब्धतेमुळे आशिया चषकासाठीचा भारतीय संघ मजबूत होईल.

(हेही वाचा – Gukesh D : भारताचा अव्वल बुद्धिबळपटू गुकेश डी बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?)

के एल राहुल आयपीएलनंतर क्रिकेट खेळलेला नाही. स्पर्धेदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्याला शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यानंतर तो बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत होता. वेळोवेळी ट्विटरच्या माध्यमातून त्याने आपली मैदानातील प्रगती चाहत्यांना सांगितली आहे. त्यानुसार सध्या तो नेट्समध्ये कसून फलंदाजीचा सराव करताना दिसतो. भारताचा पुढचा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दौरा आशिया चषकाचा आहे.

३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंकेत रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना पालिक्कल इथं पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना २ सप्टेंबरला होईल. आयर्लंडच्या दौऱ्यादरम्यान स्पर्धेसाठीचा संघ निवडला जाईल. आणि त्यासाठी के एल राहुलच्या नावाचा विचार नक्की होईल. राहुलने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतून १९८६ धावा केल्या आहेत. यात ५ शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय तो यष्टीरक्षणही करू शकत असल्यामुळे संघासाठी ही जमेची बाजू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.