Hindusthan Post Impact : एशियन गेम्स विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत दहापट वाढ

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये (एशियन गेम्स) राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

124
Hindusthan Post Impact : एशियन गेम्स विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत दहापट वाढ
Hindusthan Post Impact : एशियन गेम्स विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत दहापट वाढ

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये (एशियन गेम्स) राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एशियन गेम्स विजेत्यांना ‘युपी’ सरकारने भरभरून दिले; महाराष्ट्रातील खेळाडू मात्र उपेक्षित, अशा आशयाचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने पदक विजेत्यांच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली आहे. (Hindusthan Post Impact)

याविषयी माहिती देताना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, चीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १ कोटी रुपये, मार्गदर्शकाला १० लाख रुपये, रौप्य पदक विजत्या खेळाडूसाठी ७५ लाख रुपये, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार रुपये, कांस्य पदक प्राप्त खेळाडूस ५० लाख रुपये, मार्गदर्शकास ५ लाख रुपये रोख असे बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार आहे. (Hindusthan Post Impact)

आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस ७५ लाख, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार, रौप्यपदक विजत्या खेळाडूस ५० लाख, मार्गदर्शकास ५ लाख तर कास्य पदक विजेत्यास २५ लाख, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. (Hindusthan Post Impact)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : 34 याचिकांची 6 याचिकांत विभागणी; आजच्या सुनावणीत काय घडले ?)

याआधी किती रुपये मिळायचे?
  • यापूर्वी सुवर्ण पदकासाठी १० लाख रुपये, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपये, रौप्यपदकासाठी ७.५ लाख रुपये, मार्गदर्शकास १ लाख ८७ हजार रुपये, कांस्यपदकासाठी ५ लाख रुपये, मार्गदर्शकास १ लाख २५ हजार रुपये दिले जात होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिकस्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात राज्याच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री बनसोडे यांनी सांगितले. (Hindusthan Post Impact)
  • उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांनी आठ दिवसांपूर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा झाली, त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचेही बनसोडे यांनी यावेळी सांगितले. (Hindusthan Post Impact)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.