Asia cup 2023 : कुठला भारतीय क्रिकेटर सगळ्यात तंदुरुस्त ?

Asia cup 2023 : आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंची विशेष तंदुरुस्ती चाचणी अलूर इथं घेण्यात आली. पाहूया यात सर्वात तंदुरुस्त कुठला क्रिकेटपटू ठरला ते

89
Asia cup 2023 : कुठला भारतीय क्रिकेटर सगळ्यात तंदुरुस्त ?
Asia cup 2023 : कुठला भारतीय क्रिकेटर सगळ्यात तंदुरुस्त ?

ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ सध्या बंगळुरूमध्ये आशिया चषकाची (Asia cup 2023) तयारी करत आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने खेळाडूंसाठी बंगळुरूजवळ अलूर येथे नियमित तंदुरुस्ती चाचणी ठेवली होती. यात सगळ्यात महत्त्वाची होती ती कठीण यो-यो चाचणी. या चाचणीत युवा शुभमन गिल सगळ्यात पुढे असल्याचे दिसून आले आहे. त्याला यो-यो चाचणीत सर्वाधिक १८.७ गुण मिळाले. आतापर्यंत ज्या ज्या क्रिकेटपटूंनी ही यो-यो चाचणी घेतली आहे, त्या सगळ्यांनी ती उत्तीर्ण केली आहे. १६.५ हा यो-यो साठीचा निकष आहे. शुभमन बरोबरच विराट कोहलीनेही १७.६ गुणांसह चांगली कामगिरी केली आहे.

(हेही वाचा – Chandrayaan 3 : चंद्रयान ३ च्या यशानंतर ठाण्याच्या साने ब्रदर्स आणि एलोरा इंजिनिअर्सचे इस्रोने का केले कौतुक, वाचा सविस्तर…)

आयर्लंडहून परत आलेले जसप्रीत बुमरा, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा तसंच संजू सॅमसन यांनी अजूनही यो-यो चाचणी घेतलेली नाही. तर के एल राहुलही दुखापतीतून नुकताच सावरला आहे. त्यानेही ही चाचणी अद्याप केलेली नाही. इतर सर्वांना १७ ते १८ च्या दरम्यान गुण मिळाले आहेत.

सहा वर्षांपूर्वी नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे तंदुरुस्ती प्रशिक्षक शंकर बसू यांनी यो-यो चाचण्यांना सुरुवात केली. आणि तंदुरुस्तीसाठी त्यांनी १६.१ गुणांचा निकष ठेवला होता. पण, त्यानंतर हळूहळू तो १६.५ पर्यंत वाढवण्यात आला आहे. या चाचणीमुळे खेळाडूंची चपळता, लवचिकता मोजता येते. खेळाडू शेवटचा कधी खेळलाय आणि त्या काळात त्याने केलेली अंगमेहनत यावरून यो-यो चाचणीचे निकाल बदलतात. त्यामुळे प्रशिक्षकाला तंदुरुस्तीचा अंदाज येऊन ते तसा कार्यक्रम खेळाडूसाठी आखू शकतात.

भारतीय क्रिकेटपटूंचा कार्यक्रम व्यस्त असतो. तो पाहता, बीसीसीआयने एखाद्या मोठ्या स्पर्धेपूर्वी जेव्हा पंधरा दिवसांचा कालावधी मिळेल, तेव्हा अशा चाचण्या घेण्याचे निर्देश क्रिकेट अकॅडमीला दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.