-
ऋजुता लुकतुके
मुंबईचा फिरकीपटू तनुष कोटियन (Tanush Kotian) पंजाब किंग्जच्या ताफ्यात नेट्स गोलंदाज म्हणून दाखल झाला आहे. या हंगामापूर्वी आयपीएलच्या मेगा लिलावात तनुषवर बोली लागली नव्हती. २६ वर्षीय तनुषला पंजाबने आपल्या नेट्ससाठी बोलावलं होतं. तिथे तनुषने पंजाबच्या सर्व फलंदाजांना गोलंदाजी केली. आणि संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक सुनील जोशी यांच्या मान्यतेनंतर तनुषला नेट गोलंदाज म्हणून ताफ्यात घेण्यात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यापूर्वी ही चाचणी घेण्यात आली.
(हेही वाचा – Baluchistan Attack On Pakistan Army : बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला ; २० जणांचा जागीच मृत्यू)
सध्या पंजाबकडे यजुवेंद्र चहल हा मुख्य गोलंदाज आहे. तर प्रवीण दुबे आणि हरप्रीत ब्रार या इतर दोन लेगस्पिनरचा समावेश आहे. कोटियन (Tanush Kotian) देशांतर्गत क्रिकेटमधील आघाडीचा ऑफ स्पिनर आहे. आणि आता पंजाब संघातूनही त्याला संधी मिळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांची फिरकी खेळून काढणं हे पंजाबच्या फलंदाजांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. आणि त्यासाठी त्यांना तनुषची मदत होऊ शकते. यंदा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईने बाजी मारली. यात तनुष कोटियनचं योगदान मोठं होतं.
(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्राची आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला दांडी)
आयपीएलची बाद फेरी आता जवळ येत चालली आहे. ते पाहता प्रत्येक संघ उर्वरित सामन्यांची जोरदार तयारी करत आहे. शिवाय लीगचा दुसरा आणि निर्णायक टप्पा हा फिरकीला साथ देणारा असतो. कारण, तोपर्यंत खेळपट्ट्या जुन्या झालेल्या असतात. अशावेळी तनुष कोटियनची (Tanush Kotian) मदत पंजाब किंग्जला नक्कीच होऊ शकते. सध्या श्रेयस अय्यर पंजाब फ्रँचाईजीचा कर्णधार आहे. आणि त्यानेच तनुषचं नाव सुचवलं असल्याची शक्यता आहे. दोघं मुंबई संघातील साथीदार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community