-
ऋजुता लुकतुके
बांगलादेश संघाचा माजी कर्णधार तामिम इक्बालला (Tamim Iqbal) देशांतर्गत स्पर्धा खेळत असताना ढाक्यात मैदानातच हृदयविकाराचा झटका आला. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय. ढाक्यातील महत्त्वाची एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धा खेळताना तामिम मॉहमेडन स्पोर्टिंग क्लबचं प्रतिनिधित्व करत होता. नाणेफेकीच्या वेळी तामिम (Tamim Iqbal) मैदानावर हजर होता. त्यानंतर मात्र त्याला सुरुवातीच्या काही मिनिटांतच छातीत कळा जाणवायला लागल्या आणि त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर मैदान सोडलं आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Pray for Tamim Iqbal, May Allah grant him a speedy recovery 🙏#TamimIqbal #BangladeshCricket pic.twitter.com/4zXiKFU4zS
— Fourth Umpire (@UmpireFourth) March 24, 2025
बांगलादेशचा फुटबॉल संघ फिफा पात्रता स्पर्धेत मंगळवारी भारतीय संघाशी खेळला. या सामन्यापूर्वीही खेळाडूंनी मैदानात गोलाकर उभं राहत तामिमच्या (Tamim Iqbal) तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना केली. हा सामना बांगलादेशने गोलशून्य बरोबरीत सोडवला.
(हेही वाचा – Tejas Fighter Jet : अमेरिकेहून तेजसचे पहिले इंजिन आले ! कंपनीने सांगितले का उशीर झाला…)
Bangladesh National football team pray for Tamim Iqbal🤲#TamimIqbal pic.twitter.com/dr7o64CbBp
— Iftikher Lutfur Abdullah (@iftikher2004) March 24, 2025
तामिम (Tamim Iqbal) हा बांगलादेशचा महत्त्वाचा खेळाडू आहे. ‘छातीत दुखू लागल्यावर त्याला ढाकाजवळच्या सवर इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्याची तब्येत आधीपेक्षा सुधारत असल्याचं म्हटलं आहे,’ असं संघ प्रशासनातील एक जबाबदार व्यक्ती तारिकुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपली प्रस्तावित बैठकही त्यानंतर रद्द केली. मंडळातील अनेक पदाधिकारी तामिमच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते.
तामिम (Tamim Iqbal) बांगलादेशसाठी तीनही प्रकार मिळून एकूण ३९१ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. २००७ ते २०२३ पर्यंत तो सक्रिय होता आणि त्याने एकूण १५,००० आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक झळकावलेला तो एकमेव बांगलादेशी फलंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community