T20 World Cup, SA in Final : अफगाणिस्तानचा ९ गडी आणि ६७ चेंडू राखून धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत 

T20 World Cup, SA in Final : टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे 

101
T20 World Cup, SA in Final : अफगाणिस्तानचा ९ गडी आणि ६७ चेंडू राखून धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत 
T20 World Cup, SA in Final : अफगाणिस्तानचा ९ गडी आणि ६७ चेंडू राखून धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत 
  • ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात खेळत होता. तर आफ्रिकन संघाला टी-२० (T20 World Cup, SA in Final) किंवा एकदिवसीय विश्वचषकात घोडदौड कायमच उपान्त्य सामन्यात संपण्याचा शाप होता. अशा स्वतंत्र दडपणांखाली दोन्ही संघ त्रिनिदाद इथं आमने सामने आले. अफगाणिस्तानचा संघ (Afghanistan team) धावांचा पाठलाग करताना गळपटतो म्हणून असेल रशिद खानने दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पण, यावेळी शिस्तबद्ध गोलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघासमोर त्यांचा धुव्वा उडाला. ११.५ षटकांत ५६ धावांवर त्यांचा अख्खा संघ गारद झाला. (T20 World Cup, SA in Final)

(हेही वाचा- Vision Panorama 2024 : नेत्र तज्ञांची ‘व्हिजन पॅनोरमा 2024’ परिषद संपन्न, राज्यभरातून १३० नेत्रतज्ज्ञांचा सहभाग)

अफगाण डावात सगळ्यात जास्त धावा १३, त्याही अवांतर. बाकी अझमतुल्ला ओमारझाई या एकमेव फलंदाजाने १० धावा करत दुहेरी आकडा गाठला. गुरबाझ (Gurbaz), नाबी (Nabi) आणि नूर अहमद (Noor Ahmad) हे तिघे शून्यावर बाद झाले. बाकी फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाचा अपवाद सोडला तर प्रत्येक षटकात एकतरी अफगाण बळी गेला. त्यामुळे उपान्त्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाला आव्हान असं फारसं नव्हतंच. (T20 World Cup, SA in Final)

 मार्को यानसेनने (Marco Janssen) १६ धावांत ३, तबरेझ शाम्सीने (Tabraiz Shamsi) ६ धावांत ३ तर रबाडा (Rabada) आणि नॉरये यांनी प्रत्येकी २ – २ बळी घेतले. यानंतर विजयासाठी आफ्रिकन संघाला ५७ धावा करायच्या होत्या. दुसऱ्या षटकांत फारुकीने आक्रमक खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) थोडा त्रास दिला. चेंडू स्विंग होत होता. डी कॉकची (Quinton de Kock) बॅटची कडा घेऊन एकदा तो चकलाही होता. आता पाचव्या चेंडूचा डी कॉकला अंदाजच आला नाही. बॅट हवेत फिरली. आत वळलेला हा चेंडू थेट यष्ट्यांवर आला. ५ धावांवर क्विंटन डी कॉक बाद झाला. हा एक प्रसंग सोडला तर अफगाणिस्तानला मैदानात जल्लोषासाठी एकही क्षण नंतर किंवा आधीही मिळाला नाही. (T20 World Cup, SA in Final)

(हेही वाचा- Lal Krishna Advani : ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत खालावली; दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल)

रेझा हेनरिक्सने (Reeza Henriques) नाबाद २९ तर एडन मार्करमने (Aiden Markram) नाबाद २३ धावा करत आफ्रिकन संघाला विजय मिळवून दिला. नवव्या षटकांतच त्यांनी सामना संपवला. मार्को यानसेनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची आफ्रिकन संघाची ही पहिलीच खेप आहे. आता त्यांचा मुकाबला भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी २९ जूनला होईल. (T20 World Cup, SA in Final)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.