T20 World Cup, India Champion : आधी तो हताश होऊन बसला, इतक्यात त्याने सूर्याला चमत्कार करताना पाहिलं

T20 World Cup, India Champion : रोहितची ही प्रतिक्रिया नव्याने व्हायरल होत आहे 

169
T20 World Cup, India Champion : आधी तो हताश होऊन बसला, इतक्यात त्याने सूर्याला चमत्कार करताना पाहिलं
T20 World Cup, India Champion : आधी तो हताश होऊन बसला, इतक्यात त्याने सूर्याला चमत्कार करताना पाहिलं
  • ऋजुता लुकतुके 

टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, India Champion) अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने लाँगऑनला सीमारेषेजवळ टोलवला. चेंडू हवेत आणि उंच गेल्यावर मिडऑफला उभ्या असलेल्या रोहितची (Rohit) प्रतिक्रिया मंगळवारपासून सोशल मी़डियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील बदलते भाव यात स्पष्ट दिसतात. चेंडू हवेत उंच गेल्यावर रोहित दोन्ही गुडघ्यांवर जमिनीवर झपकन बसलेला आपल्याला व्हीडिओत दिसतो. अर्थातच, चेंडू सीमापार जाईल ही भीती त्याला वाटतेय.

(हेही वाचा- Devendra Fadnavis: लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले…)

पण, एकदा का सूर्यकुमारने (Suryakumar) तो झेल पकडला, रोहितचा (Rohit) चेहराच एकदम बदलून जातो. झेल पकडला गेल्याची खात्री त्याच्या चेहऱ्यावर दिसते. तो जल्लोषही सुरू करतो. (T20 World Cup, India Champion)

 २ जूनला संध्याकाळी साडेपाच वाजता अपलोड झालेला हा व्हीडिओ आतापर्यंत १५ लाख लोकांनी ट्विटरवरच पाहिला आहे. या झेलानंतर पुढचे दोन दिवस सूर्यकुमार यादवलाही (Suryakumar) त्याच विषयीचे प्रश्न लोक विचारत आहेत. ‘ती दैवी योजना होती. माध्याकडून काहीतरी वेगळं घडावं आणि देवाने माझी त्यासाठी निवड करावी, देशाचा विजय त्यामुळे साध्य व्हावा, हे सगळं दैवीच आहे,’ असं सूर्यकुमार (Suryakumar) सामन्यानंतर म्हणाला. (T20 World Cup, India Champion)

(हेही वाचा- Best Engineering Colleges In Maharashtra : महाराष्ट्रामध्ये कोणते इंजिनियरिंग कॉलेज आहेत टॉप ५? जाणून घ्या)

क्रिकेट रसिक या झेलाची तुलना १९८३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील कपिल देवच्या (Kapil Dev) मागे धावत घेतलेल्या झेलाशी करत आहेत. तो झेलही विंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स यांचा होता. आणि त्यामुळे १९८३ मध्ये भारताचा विजय शक्य झाला. (T20 World Cup, India Champion)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.