T20 World Cup, Ind vs Eng : विराट कोहली उपांत्य फेरीतही स्वस्तात बाद, किंग कोहलीला झालंय काय?

T20 World Cup, Ind vs Eng : इंग्लंड विरुद्ध विराट फक्त ९ धावा करून बाद झाला

100
T20 World Cup, Ind vs Eng : विराट कोहली उपांत्य फेरीतही स्वस्तात बाद, किंग कोहलीला झालंय काय?
T20 World Cup, Ind vs Eng : विराट कोहली उपांत्य फेरीतही स्वस्तात बाद, किंग कोहलीला झालंय काय?
  • ऋजुता लुकतुके

एरवी किंग कोहली हा मोठ्या सामन्यांसाठी बनलेला चॅम्पियन खेळाडू आहे. उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत तो कधीही दुहेरी धावसंख्येच्या आत बाद झालेला नाही. पण, इंग्लंड विरुद्ध षटकात एक षटकार ठोकलेला असताना तसाच फटका खेळण्याच्या प्रयत्नांत विराट त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चेंडूंत ९ धावा केल्या. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत फ्लॉप ठरण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. (T20 World Cup, Ind vs Eng)

(हेही वाचा- India’s Universities: जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे पंतप्रधानांकडून कौतुक)

एकूणच हा विश्वचषक त्याच्यासाठी विसरुन जाण्यासारखा ठरलाय. सात सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघाले नाही. विराट कोहलीला (Virat Kohli) उपांत्य सामन्यातही मोठी खेळी करता आलेली नाही. टी २० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात विराट कोहली पहिल्यांदाच फ्लॉप गेलाय. याआधी झालेल्या तीन सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकले होते. पण, यंदा गुरुवारी विराट ९ एकेरी धावसंख्येवर बाद झाला. विराट कोहलीला यंदाच्या विश्वचषकात १०० धावाही करता आलेल्या नाहीत, त्याची सर्वोच्च धावसंख्या ३७ इतकी आहे. (T20 World Cup, Ind vs Eng)

विराट कोहलीला यंदाच्या विश्वचषकात अद्याप एकही अर्धशतक ठोकता आलेली नाही. स्पर्धेत त्याला फक्त दोन वेळा दुहेरी धावसंख्या करता आली आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त ३७ इतकी आहे. बांगलादेशविरोधात २४ आणि अफगाणिस्तानविरोधात ३७ धावा. दोनवेळा त्याला दुहेरी धावसंख्या करता आली. विश्वचषकात विराट कोहली (Virat Kohli) दोन वेळा शून्यावर तंबूत माघारी जावं लागलेय. आज झालेल्य उपांत्य सामन्यात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. रीस टोप्लीने विराट कोहलीला फक्त नऊ धावांवर त्रिफाळाचीत केले. याआधी टी २० विश्वचषकाच्या प्रत्येक उपांत्य सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक टोकलेय. पहिल्यांदाच विराट कोहली फ्लॉप ठरलाय. (T20 World Cup, Ind vs Eng)

(हेही वाचा- Electricity Theft बाबत बेस्टची दिखावू कारवाई; दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमधील दिवे पुन्हा उजळले)

विराट कोहलीने टी-२० विश्वचषक २०१४ मध्ये पहिल्यांदा उपांत्य सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी केली होती. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती.  त्यानंतर २०१६ मध्येही टीम इंडिया टॉप-४ मध्ये पोहोचली होती. उपांत्य फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी झाला होता. यावेळी विराटने ४७ चेंडूत ८९ धावा केल्या होत्या. पण या सामन्यात बारताचा सात गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.  (T20 World Cup, Ind vs Eng)

२०२२ टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup, Ind vs Eng) उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांचा आमनासामना झाला होता. त्या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने (Virat Kohli) ४० चेंडूत अर्धशतक ठोकले होते. भारताने १६८ धावा केल्या होत्या. पण या सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला होता.  २०२४ च्या टी २० विश्वचषकात विराट कोहली फ्लॉप गेला. विराट कोहलीला अर्धशतक ठोकता आले नाही. (T20 World Cup, Ind vs Eng)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind in Final : इंग्लंडचा ६८ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत)

टी २० विश्वचषकात विराट कोहली फ्लॉप ठरला. विराट कोहलीला (Virat Kohli) संपूर्ण स्पर्धेत १०० धावाही करता आल्या नाहीत. विराट कोहलीला सात सामन्यात फक्त ७५ धावाच करता आल्यात. सात सामन्यात विराट कोहली दोन वेळा शून्यावर बाद झाला. तर ३ सामन्यात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. विराट कोहलीला फक्त दोन वेळा दुहेरी धावसंख्या पार करता आली.  (T20 World Cup, Ind vs Eng)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.