T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकाच्या न्यूयॉर्कमधील सामन्यांसाठी स्निपर्स तैनात

T20 World Cup 2024 : याच ठिकाणी ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना होणार आहे.

70
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकाच्या न्यूयॉर्कमधील सामन्यांसाठी स्निपर्स तैनात
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत न्यूयॉर्कच्या नसॉ काऊंटी क्रिकेट स्टेडिअमवर ८ सामने होणार आहेत. लाँग आयलंडमधील या स्टेडिअमवर ३ जून ते १२ जून दरम्यान हे सामने होतील आणि त्यासाठी न्यूयॉर्क पोलिसांनी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्या दरम्यान इथं पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाबरोबरच स्निपर्सही दिसले.  (T20 World Cup 2024)

स्टेडिअम असलेल्या संकुलाला आयसेन हॉवर क्रीडा संकुल असं म्हणतात. प्रत्यक्ष मैदानाबरोबरच मैदानाभोवतीही अमेरिकन सुरक्षा यंत्रणेची जमीन तसंच आकाशातूनही नजर असणार आहे. इस्लामिक स्टेट्‌स् या दहशतवादी संघटनेच्या एका शाखेनं विश्वचषक (World Cup) स्पर्धेदरम्यान घातपाती कारवाईची धमकी ई-मेलने दिली आहे. त्यामुळे हा बंदोबस्त इथं पाहायला मिळत आहे. स्टेडिअमच्या आत तर साध्या वेशातील पोलिसांची फौजच कार्यरत आहे. आणि मैदानातील चार खेळपट्ट्यांवरही त्यांची करडी नजर आहे. (T20 World Cup 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर!)

नसॉ पोलीस खात्याने सुरक्षेसाठी फेडरल तपास यंत्रणा, युएस होमलँड सेक्युरिटी तसंच न्यूयॉर्क पोलीस खात्याची मदत स्पर्धेदरम्यान घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनंही सुरक्षेच्या बाबतीत विशेष लक्ष दिलं आहे. बीबीसी स्पोर्टला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सामन्यात सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा आनंद घेणारे प्रेक्षक यांची सुरक्षा ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,’ असं आयसीसीने (ICC) पत्रक काढून जाहीर केलं आहे. (T20 World Cup 2024)

‘आम्ही स्थानिक यजमान देशाच्या सुरक्षा यंत्रणेबरोबर काम करत आहोत. स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी सुरक्षा रणनीती तयार करणं आणि तिचं कडेकोट पालन यावर आमचंही लक्ष असेल. जगातील परिस्थितीवरही आमचं लक्ष असेल,’ असं आयसीसीने पत्रकात पुढे म्हटलं आहे. तुमच्याकडे सामन्याचं तिकीट नसेल तर अशा लोकांना आता इथले सामने पार पडेपर्यंत स्टेडिअममध्ये प्रवेश नसेल. आवश्यकतेप्रमाणे लोकांना प्रवेशासाठी पासेस दिले जातील. तर स्पर्धेच्या दिवसांत तिकीट धारकांसाठीही काही नियम असतील. प्रेक्षकांनाही स्कॅनर्ससह इतरही सुरक्षा बंदोबस्तातून जावं लागेल. आणि सुरक्षा बंदोबस्त विमानतळापासूनच सुरू होईल. अमेरिकेत ‘सुपर बोल’ सामन्यांच्या वेळी असलेला बंदोबस्त आणि टी-२० विश्वचषकासाठी असलेला बंदोबस्त सारखाच असेल. (T20 World Cup 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.