Suryakumar Yadav : २०२३ मध्येही आयसीसी टी-२० पुरस्कारासाठी सुर्यकुमारचंच पारडं जड

सुर्यकुमार यादवने टी-२० प्रकारात १७ डावांमध्ये ७३३ धावा केल्या आहेत. आणि त्याचा स्ट्राईक रेट आहे १५५ धावांचा.

142
Suryakumar Yadav : ताज्या आयसीसी क्रमवारीत सूर्यकुमार यादव टी-२० फलंदाजांत अव्वल
  • ऋजुता लुकतुके

सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टी-२० प्रकारात १७ डावांमध्ये ७३३ धावा केल्या आहेत. आणि त्याचा स्ट्राईक रेट आहे १५५ धावांचा.

भारताचा स्टार टी-२० फलंदाज सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू (टी-२०) या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ३३ वर्षीय सुर्याने गेल्यावर्षी हा पुरस्कार मिळवलेला आहे. आणि यंदाही तो प्रबळ दावेदार मानला जातोय. २०२३ कॅलेंडर वर्षांत सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) १७ डावांमध्ये ७३३ धावा केल्या आहेत त्या ४८ ची सरासरी आणि १५५ धावांच्या स्ट्राईक रेटने.

सातत्यपूर्ण आणि प्रभावशाली खेळामुळे टी-२० प्रकारात सुर्यकुमारने चांगलीच छाप पाडली आहे. आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीतही तो सातत्याने अव्वल स्थान राखून आहे. सुर्यकुमार बरोबरच भारताचा आणखी एक फलंदाज या नामांकनांमध्ये झळकतोय. आणि तो आहे युवा सलामीवीर यशस्वी जयसवाल. आयसीसीच्या उगवत्या क्रिकेटपटूंच्या यादीत यशस्वीला स्थान मिळालं आहे.

(हेही वाचा – Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आले वाहतुकीत बदल ;जाणून घ्या काय आहे कारण)

यशस्वी जयसवालने यंदा कसोटी क्रिकेटमध्येही भारताकडून पदार्पण केलं. आणि यात ७० ची सरासरी राखत त्याने २ कसोटीत मिळून २८२ धावा केल्या आहेत. तर टी-२० प्रकारात ४३० धावा केल्या आहेत त्या ३८ च्या सरासरीने. आणि त्याचा स्ट्राईक रेट आहे १५९ धावांचा. जयसवालला या पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि आफ्रिकन गेराल्ड कोत्झीए यांच्याकडून स्पर्धा आहे.

सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) यंदा भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने भारताला ४-१ असा विजय मिळवून दिला. शिवाय या मालिकेत तो मालिकावीरही ठरला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.