- ऋजुता लुकतुके
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी केलेला फलंदाज आहे तो सूर्यकुमार यादव. पंजाबविरुद्धही ३९ चेंडूंत ५७ धावा करत त्याने मुंबईला ७ बाद १८४ अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. चौथ्या क्रमांकावर खेळत अशी डाव सावरणारी आणि धावा वाढवणारी कामगिरी या हंगामात सूर्यकुमारने वेळोवेळी केली आहे. आणि त्याच्या जोरावर तो ऑरेंज कॅपच्या (Orange Cap) शर्यतीत असलेला एकमेव मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) फलंदाज आहे. तर हंगामातील सर्वाधिक धावांच्या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रमही मागे टाकला आहे. (IPL 2025, Mi vs PBKS)
यापूर्वी २०१० मध्ये सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्ससाठी हंगामात ६१८ धावा केल्या होत्या. त्याने हंगामात ऑरेंज कॅपही पटकावली होती. आणि मुंबईचा संघ त्यावर्षी उपविजेता ठरला होता. त्यानंतर एकाच हंगामात ६०० धावांचा टप्पा गाठणारा सूर्यकुमार (Suryakumar Yadav) हा फक्त दुसरा मुंबई इंडियन फलंदाज आहे. आणि यंदा १४ सामन्यांमध्ये आतापर्यंत सूर्यकुमारने ६४० धावा केल्या आहेत. सध्या तो साई सुदर्शन (६७९) आणि शुभमन गिल (६४९) यांच्या पाठोपाठ ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणखी बाद फेरीचा किमान एक सामना त्याला खेळता येणार आहे. (IPL 2025, Mi vs PBKS)
(हेही वाचा – India Tour of England : भारत, इंग्लंड मालिका सोनी टीव्हीवर, डिजिटल प्रसारण जिओ हॉटस्टारवर)
मुंबई इंडियन्सकडून यापूर्वी हंगामात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज बघूया,
६४०* धावा – सूर्यकुमार यादव (२०२५)
६१८ धावा – सचिन तेंडुलकर (२०१०)
६०५ धावा – सूर्यकुमार यादव (२०२३)
५५३ धावा – सचिन तेंडुलकर (२०११)
५४० धावा – लेंडल सिमन्स (२०१५)
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) २०२३ च्या हंगामात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत संघाचं एका सामन्यात नेतृत्वही केलं होतं. यंदा सूर्यकुमारने १४ सामन्यांत आतापर्यंत ७१ धावांची सरासरी आणि १६८ धावांच्या स्ट्राईकरेटने ६४० धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतकं आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. आणि त्यांनी बाद फेरी गाठली आहे. बाद फेरीत त्यांचा सामना तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेचं अंतिम चित्र स्पष्ट होईल. (IPL 2025, Mi vs PBKS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community