Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal : गावसकर यांनी सर्फराझला दिला सर डॉन ब्रॅडमन यांनी दिलेला सल्ला

६० चेंडूंत ५६ धावा केल्यावर मारलेल्या चुकीच्या फटक्यामुळे गावसकर सर्फराझवर नाराज आहेत.

136
Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal : गावसकर यांनी सर्फराझला दिला सर डॉन ब्रॅडमन यांनी दिलेला सल्ला
  • ऋजुता लुकतुके

सर्फराझ खानने या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून ३ अर्धशतकं केली आहेत. आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने भारतीय डावाला आकारही दिला आहे. खासकरून फिरकीला खेळताना सर्फराझने दाखवलेली पारंपरिक क्रिकेटची झलक जाणकारांचीही वाहवा मिळवून गेली आहे. पण, असं असतानाही ६० चेंडूंत ५६ धावा केल्यानंतर तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर सुनील गावसकर नाराज आहे. त्यांच्यामते पदार्पणाची खेळी सोडली (जडेजाला शतक पूर्ण करू देण्याच्या प्रयत्नात सर्फराझ धावचीत झाला होता) तर सर्फराझ दोनही अर्धशतकांनंतर चुकीचा फटका खेळून बाद झाला आहे. (Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal)

आणि म्हणूनच सुनील गावसकर यांनी सर्फराझला डॉन ब्रॅडमन यांनी एकेकाळी दिलेला सल्ला दिला आहे. सर्फराझने तोपर्यंत ८ चौकार आणि १ दणदणीत षटकार खेचला होता. गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं होतं. देवदत्त पड्डिकल बरोबर ९५ धावांची भागिदारी रचली होती. आणि अशावेळी ५६ धावांवर असताना बशिरच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये जो रुटकडे झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर भारतीय डावही त्या मानाने लवकर आटोपला. (Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal)

(हेही वाचा – IPL 2024 : सनरायजर्स हैद्राबादची नवीन जर्सी कशी आहे?)

आणखी एका कारणामुळे गावसकर सर्फराझवर नाराज 

म्हणूनच समालोचन कक्षात बसलेले सुनील गावसकर पटकन म्हणाले, ‘सर डॉन ब्रॅडमन यांनी म्हणून ठेवलंय. अर्धशतक झालं की, शून्यापासून सुरुवात करावी.’ सुनील यांच्या शब्दांत विस्ताराने सांगायचं तर, ‘डॉन ब्रॅडमन एकदा मला म्हणाले होते. कितीही धावांवर खेळत असलास तरी पुढचा चेंडू खेळताना असाच विचार करायचा की शून्यावर आहोत. विकेटची किंमत आपल्याला कळली पाहिजे.’ ब्रॅडमन यांचा हा सल्ला कायम लक्षात ठेवला आणि तशीच फलंदाजी केली असं सुनील गावसकर यांचं म्हणणं आहे. (Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal)

सर्फराझने खेळलेल्या फटक्यावर आणखी एका कारणामुळे ते नाराज आहेत. ‘ते चहापानानंतरचं फक्त पहिलं षटक होतं. आणि जो चेंडू पुढे सरसावून खेळायंच सर्फराझने ठरवलं तो त्यासाठी योग्य नव्हता. पहिल्याच चेंडूंवर असा आतातायी फटका त्याने खेळायला नको होता,’ असं गावसकर म्हणाले. अर्थात, ही गोष्ट ते सर्फराझला भेटूनही सांगणार आहेत. सर्फराझ बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलही १५ धावा करून बाद झाला. तर अश्विनला हार्टलीने शून्यावर त्रिफळाचीत केलं. कुलदीप आणि जसप्रीत बुमरा यांनी नवव्या गड्यासाठी ४६ धावांची भागिदारी करून भारताला ४५० धावांचा टप्पा गाठून दिला. अखेर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ४७७ धावांत सर्वबाद झाला. आणि पहिल्या डावात भारताला २५९ धावांची आघाडी मिळाली. (Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.