Sunil Gavaskar : ‘…तर भारतीय संघ कसोटीत अजेय होईल,’ – सुनील गावसकर

Sunil Gavaskar : सुनील गावसकर यांनी कसोटी संघात एक बदल सुचवला आहे.

143
Sunil Gavaskar : ‘...तर भारतीय संघ कसोटीत अजेय होईल,’ - सुनील गावसकर
  • ऋजुता लुकतुके

दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला कसोटीत अजेय व्हायचं असेल तर संघात एक महत्त्वाकांक्षी बदल सुचवला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघात योग्य प्रकारे हाताळावं असा सल्ला त्यांनी संघ प्रशासनाला दिला आहे. अलीकडे झालेल्या टी-२० विश्वचषकात हार्दिकने भारतासाठी चांगली कामगिरी बजावली. महत्त्वाचं म्हणजे १४४ धावांसह त्याने ११ बळीही मिळवले. त्यामुळे गावसकर यांच्यामते भारतीय संघ ज्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे, तो खेळाडू हार्दिक असू शकतो. (Sunil Gavaskar)

भारतीय संघा या हंगामात न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी खेळणार आहे. आणि जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. खासकरून ऑस्ट्रेलियात हार्दिकचा चांगला उपयोग होऊ शकतो, असं गावसकर यांना वाटतं. ‘सहाव्या, सातव्या क्रमांकावर तो फलंदाजी करू शकला आणि दिवसांत दहा षटकं जरी टाकू शकला, तरी त्याचा खूप चांगला फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. अष्टपैलू तेज गोलंदाज म्हणून तो महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. त्याला कसोटी खेळण्यासाठी तयार करावं लागेल,’ असं गावसकर रेव्हस्पोर्ट्स या वेबसाईटशी बोलताना म्हणाले. (Sunil Gavaskar)

(हेही वाचा – नेत्यांच्या भाजपा प्रवेशामुळे AAP ला मोठा हादरा)

हार्दिक मागची ६ वर्षं कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. भारतासाठी २०१८ पर्यंत तो एकूण ११ कसोटी सामने खेळला आहे. आणि यात त्याने ३२ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे १०८. तर १७ बळीही त्याने घेतले आहेत. २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध तो शेवटची कसोटी खेळला आहे. भारतीय संघ अजून परदेशात म्हणावा तसा जिंकत नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका ही भारतासाठी आव्हानात्मक मैदानं आहेत. अशावेळी सातत्यपूर्ण कामगिरी हवी असेल तर हार्दिक पांड्या हा चांगला पर्याय असेल असं गावसकर यांना वाटतंय. (Sunil Gavaskar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.