Sunil Gavaskar : ‘आयपीलच्या कामगिरीवर भरवसा ठेवण्यापेक्षा देशांतर्गत क्रिकेटची कामगिरी पाहा’ – सुनील गावस्कर गरजले

Sunil Gavaskar : आयपीएल संघांना सुनील गावस्करांनी आरसा दाखवला आहे.

33
Sunil Gavaskar : ‘आयपीलच्या कामगिरीवर भरवसा ठेवण्यापेक्षा देशांतर्गत क्रिकेटची कामगिरी पाहा’ - सुनील गावस्कर गरजले
  • ऋजुता लुकतुके

माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आयपीएलच्या मालकांवर संघ निवडीवरून जोरदार टीका केली आहे. हे फ्रँचाईजी मालक देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी न पाहता, राज्यस्तरीय लीगमधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड करत आहेत. त्यामुळे अर्धकच्च्या खेळाडूंना संधी मिळते पण, चांगले खेळाडू मागे राहतात, असं गावस्कर यांनी थेटच सुनावलं आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा भारतात खेळवली जाते. तरीही या स्पर्धेतील कामगिरी न पाहता, आयपीएलचे संघ इतर स्पर्धांतील कामगिरी पाहतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे.

(हेही वाचा – तरुणाईला Veer Savarkar उमगायला लागले की, हिंदु राष्ट्र निर्माण होईल; गीता उपासनी यांनी व्यक्त केला विश्वास)

मिड-डे मध्ये लिहिलेल्या स्तंभात सुनील गावस्करांनी (Sunil Gavaskar) या मुद्याला हात घातला आहे. ‘यंदा आयपीएलमध्ये हे पुन्हा दिसून आलं की, संघ स्थानिक लीगमधील कामगिरींवर विसंबून खेळाडूंची निवड करत आहेत. पण, अशी निवड करणारे संघ मागे राहिले. मुश्ताक अली हीच देशातील सगळ्यात मोठी स्थानिक स्पर्धा आहे. तेथील कामगिरीच गृहित धरायला हवी होती,’ असं गावस्कर लेखात लिहितात. तरुण खेळांडूंची खेळाकडे बघण्याची मानसिकताही बदलत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.

(हेही वाचा – “माझी मुलगी राजाचा जीव घेऊच शकत नाही…”; ‘Sonam Raghuvanshi’च्या वडिलांचा धक्कादायक दावा)

‘तरुण खेळाडूंचं खेळण्याचं प्रेरणास्थानही बदललं आहे. त्यांना कामगिरीपेक्षा पैसा कमावणं जास्त महत्त्वाचं वाटत आहे. त्यामुळे ते फक्त संघात राहण्यानेच खुश आहेत. असे खेळाडू पुढे जाऊन टिकू शकत नाहीत आणि देशातील क्रिकेटचा स्तर त्यामुळे बिघडत चालला आहे,’ असं गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी लिहिलं आहे. तर खेळाडूंचं स्ट्राईकरेटवर असलेलं प्रेमही त्यांना काळजी करण्यासारखं वाटतं. ‘खेळाडू ५ चेंडूंत १५ धावा करतात आणि म्हणतात स्ट्राईक रेट ३०० होता. पण, आणखी १५ चेंडू फलंदाज टिकला असता तर त्याने संघासाठी आणि वैयक्तिकही अधिक चांगली कामगिरी केली असती, हे या पिढीला पटतच नाही,’ असं गावस्कर म्हणतात. त्यांनी सिक्स-हिटर्स ही संकल्पना वापरून अशा खेळाडूंवर टीका केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.