Sunil Chhetri Retires : भावूक अवस्थेत सुनील छेत्रीने स्वीकारली सहकाऱ्यांची मानवंदना

Sunil Chhetri Retires : भारत विरुद्ध कुवेत हा सामना सुनील छेत्रीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता 

108
Sunil Chhetri Retires : भावूक अवस्थेत सुनील छेत्रीने स्वीकारली सहकाऱ्यांची मानवंदना
Sunil Chhetri Retires : भावूक अवस्थेत सुनील छेत्रीने स्वीकारली सहकाऱ्यांची मानवंदना
  • ऋजुता लुकतुके 

कोलकाता शहर हे भारतीय फुटबॉलची पंढरी आहे. इथल्या फुटबॉलप्रेमी मूळातच भारावलेले असतात. त्यातच सॉल्टलेक सिटीमध्ये गुरुवारी भारतीय फुटबॉलचा खरा स्टार सुनील छेत्री (Sunil Chhetri Retires) आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. क्रिकेट सामन्याला होते तशी गर्दी कोलकात्यात फुटबॉलला होते. गुरुवारीही स्टेडिअम खचाखच भरलेलं होतं. पण, त्यात माहौल नव्हता. उलट चाहत्यांची भावना सुनील छेत्रीला सेंड (Sunil Chhetri Retires) – ऑफ देण्याची होती. त्यामुळे मैदानात जल्लोष नाही तर हळवेपणा होता.  (Sunil Chhetri Retires)

(हेही वाचा- Sunanda Pawar : “पवार कुटुंब पुन्हा एकत्र…”, रोहित पवारांच्या आई नेमकं काय म्हणाल्या?)

चाहत्यांनी भारतीय संघाची निळी जर्सी घातली होती. आणि तिच्यावर क्रमांक होता ११. छेत्रीच्या जर्सीचा क्रमांक. यातूनच लोकांचं त्याच्यावरील प्रेम दिसून येत होतं. सामन्यात गोलशून्य बरोबरी राहिली. पण, लोकांचं लक्ष सुनीलवर होतं. मैदानात चाहत्यांनी त्याच्यासाठी बॅनर झळकावले. तर भारतीय संघाने १९ वर्षं राष्ट्रीय संघाची सेवा करणाऱ्या या शिपायाला मानवंदना दिली. सुनीलही तेव्हा अश्रू रोखू शकला नाही. (Sunil Chhetri Retires)

‘सोनेरी सुनील!’ आमच्या ह्रदयात तू अखेरपर्यंत राहशील!

‘शेवटपर्यंत भारतीय राहीन,’

(हेही वाचा- Parliment Security Breach: संसदेची सुरक्षा भेदण्याचा पुन्हा प्रयत्न, बनावट आधारकार्डवर परिसरात शिरणाऱ्या तिघांना अटक)

‘कर्णधार, नेता, दिग्गज खेळाडूचे आभार!’ असे फलक स्टेडिअमभर (Falak Stadium) लागले होते. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष सामन्याला हजर होते. तर पश्चिम बंगालचे क्रीडामंत्रीही आवर्जून हजर राहिले. या सगळ्यात खेळावरचं लक्ष मात्र सुनील छेत्रीने (Sunil Chhetri Retires) हटू दिलं नाही. ३९ वर्षीय सुनील मैदानावर तरुणाला लाजवेल अशा चपळाईने धावत होता. गोल मात्र तो साध्य करू शकला नाही. काही गोलच्या संधी निर्माण झाल्या होत्या. पण, भारतीय संघ त्या पूर्णत्वास नेऊ शकला नाही. (Sunil Chhetri Retires)

फुटबॉलवरील प्रेम, चिकाटी आणि समर्पण हे सुनील छेत्रीचे गुण त्याच्या कारकीर्दीत नेहमीच उठून दिसले. (Sunil Chhetri Retires)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.