Sunil Chhetri : सुनील छेत्रीला पाहण्यासाठी जेव्हा दोहामध्येही गर्दी होते

भारतीय फुटबॉल संघ आशियाई स्पर्धेसाठी कतारच्या दोहामध्ये पोहोचला आहे. 

136
Sunil Chhetri : सुनील छेत्रीला पाहण्यासाठी जेव्हा दोहामध्येही गर्दी होते
Sunil Chhetri : सुनील छेत्रीला पाहण्यासाठी जेव्हा दोहामध्येही गर्दी होते
  • ऋजुता लुकतुके

भारतीय फुटबॉल स्टार ३९ वर्षीय सुनील छेत्री (Sunil Chhetri) यंदा कदाचित आपली शेवटची आशियाई फुटबॉल स्पर्धा खेळत आहे. पण, फुटबॉल चाहत्यांमधली त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. उलट भारताबाहेर आशियातही तो लोकप्रिय आहे. भारतीय फुटबॉल संघ आशिया चषकासाठी दोहामध्ये पोहोचला तेव्हा त्याचीच प्रचिती आली. (Sunil Chhetri)

संघ मैदानाची पाहणी करण्यासाठी स्टेडिअमवर आला तेव्हाही चाहते सुनील छेत्रीच्या (Sunil Chhetri) नावाचा घोष करत होते. आणि तो मैदानात होता तोपर्यंत त्यांचा गलका सुरूच होता. त्यामुळे आशिया चषकातील भारताच्या सामन्यांना प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळेल, असं आयोजकांनाही वाटतंय. (Sunil Chhetri)

‘सुनील (Sunil Chhetri) या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आणि त्याच्या नावावर सामन्याची तिकिटं काढणारे अनेक चाहते आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यात त्याचा मोठा वाटा असेल,’ असं स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्सीम अब्दुल अझिझ अल जसीम यांनी मीडियाशी बोलताना म्हणाले. (Sunil Chhetri)

(हेही वाचा – Unauthorized Boards : आता अनधिकृत फलकांची छपाई करणाऱ्यांची खैर नाही)

भारतीय प्रेक्षकांचा लाडका सुनील छेत्री

सुनील छेत्री (Sunil Chhetri) आतापर्यंत १४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. आणि या स्पर्धेतील तीन सगळ्यात जास्त अनुभवी खेळाडूंपैकी तो एक आहे. कतारचा फॉरवर्ड हसन अल हैदोस १७५ सामने खेळलाय. तर बहारिनचा गोलकीपर सय्यद महम्मद जाफर १६१ सामने खेळला आहे. २०२२ मध्ये कतारला फिफा विश्वचषक झाला होता तेव्हा बाहेरून येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये भारतीयांची संख्या सौदी अरेबियानंतर सगळ्यात जास्त होती. विश्वचषकासाठी भारतातून ५६,८९३ इतके फुटबॉल रसिक कतारला गेले होते. (Sunil Chhetri)

आताही आशिया चषकात कतारच्या खालोखाल भारतीय सामन्यांची तिकिटं खपली आहेत. आणि भारतीय प्रेक्षकांचा लाडका आहे तो सुनील छेत्री. (Sunil Chhetri)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.