-
ऋजुता लुकतुके
भारताचा वादग्रस्त माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतवर केरळ क्रिकेट असोसिएशनने ३ वर्षांची बंदी घातली आहे. तो यापुढे राज्यातील कोणत्याही क्रिकेटशी संबंधित स्पर्धेत किंवा सामन्यात खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणून भाग घेऊ शकणार नाही. श्रीसंतने अलीकडेच टीव्हीवरील एका कार्यक्रमात संजू सॅमसन भारतीय संघाकडून न खेळण्यासाठी केरळ क्रिकेट असोसिएशन जबाबदार असल्याचं विधान केलं होतं. त्यावरून शिस्तभंगाची ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीसंतने सॅमसनविरुद्ध केलेल्या टीकेनंतर, केसीएने ३० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत माजी गोलंदाजावर बंदी घातली. संजू सॅमसन २०२४ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. आधीच्या देशांतर्गत हंगामात केरळ असोसिएशनने त्याला केरळ संघात स्थान न दिल्यामुळे तो निवडीसाठीच उपलब्ध नव्हता. त्यासाठी श्रीसंतने केरळ असोसिएशनला जबाबदार धरलं होतं. (Sreesanth Banned)
(हेही वाचा – Uttarakhand हिंदू राज्य होण्याच्या मार्गावर; राज्याबाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यावर बंदी)
श्रीसंत हा केरळ क्रिकेट लीग संघ कोल्लम एरीजचा सह-मालक आहे. केसीएचे अधिकारी विनोद कुमार म्हणाले, ‘भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आता ३ वर्षांसाठी राज्यात कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट कार्यक्रमात भाग घेऊ शकणार नाही. तो फ्रँचायझीचा मालक राहील, परंतु क्रिकेटशी संबंधित कोणत्याही कामांपासून दूर राहील.’ श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी कुमारी यांनी क्रिकबझला सांगितले की, ‘आम्हाला केसीएकडून अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नाही. आम्हाला या बंदीची माहिती फक्त माध्यमांकडूनच मिळाली. श्रीसंत फक्त त्याच्या सहकारी क्रिकेटपटूला पाठिंबा देत होता. केसीएकडून अधिकृत सूचना मिळताच, आम्ही त्याला कसे प्रतिसाद द्यायचे ते पाहू. (Sreesanth Banned)
(हेही वाचा – Tanisha Bhise यांच्या जुळ्या बाळांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाखांची तातडीची मदत)
२०१२ च्या आयपीएलमध्ये फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर ४२ वर्षीय श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. तथापि, २०१३ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले. त्यानंतर तो लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये आशिया-११ आणि भारतीय संघाकडून खेळला आहे. श्रीसंतने भारतासाठी २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले. तो २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही भाग होता. तो २००६ मध्ये भारताकडून चॅम्पियन्स करंडकही खेळला आहे. (Sreesanth Banned)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community