
-
ऋजुता लुकतुके
अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापारी युद्ध होण्याची भीती सध्या जागतिक बाजारात अनिश्चिचता निर्माण करतेय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पहिल्यांदाच त्यावर मत व्यक्त करताना संभाव्य व्यापारी युद्ध जागतिक अर्थव्यवस्थेवर तीन प्रकारचे गंभीर परिणाम करू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘व्यापारी युद्धाची तीव्रता वाढली आणि देशांनी आपला स्वार्थ सुरक्षित करण्याची भूमिका ठेवली तर त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. शिवाय उत्पादनाचा खर्च वाढून देशांचे गुंतवणुकीचे गणित बदलते. आणि परकीय गुंतवणुक कमी होते,’ असं अर्थमंत्री म्हणाल्या.
हे सांगतानाच अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. ‘उतार चढावांनी भरलेल्या, अनिश्चित, जटील आणि संदिग्ध वातावरणात भारतीय अर्थव्यवस्था मात्र सशक्त आहे. आणि मॅक्रो पातळीवर भारत भक्कम उभा आहे,’ असं सीतारमण (Nirmala Sitharaman) म्हणाल्या. बाँबे स्टॉक एक्सचेंजला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.
(हेही वाचा – बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले credit card; बँकेलाच एक कोटी २६ लाखांना फसवले)
अमेरिकेचं आयात शुल्क वाढवण्याचं धोरण देशभरातील देशभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम घडवून आणत आहे. २ एप्रिलला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी जगातील विविध देशांवर आयात शुल्क दरवाढीचा बडगा उगारला. चीनवर ३४ टक्के तर भारतातून आयात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवर त्यांनी २६ टक्के आयात शुल्क लादलं. परिणामी, भारतीय शेअर बाजारातही (Indian stock market) ४ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान अभूतपूर्व घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांचं १० लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. यावरही सीतारमण (Nirmala Sitharaman) सविस्तर बोलल्या. ‘अशा पडझडीत किरकोळ गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर होतात. त्यांचा विश्वास उडतो. पण, भारतीय शेअर बाजारांना (Indian stock market) गेल्या काही वर्षांत किरकोळ गुंतवणूकदारांचाच सहारा मिळाला आहे. हा आधार भक्कम असून वाढणारा आहे,’ असं त्या म्हणाल्या.
भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापाररी करारावर सध्या चर्चा सुरू आहेत. आणि खुद्द अर्थमंत्री पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये काही बैठका घेण्याबरोबरच त्या व्यापारी करारातही लक्ष घालतील असा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community