-
ऋजुता लुकतुके
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र (Rachin Ravindra) यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. श्रेयसला दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये फेब्रुवारीत तो या पुरस्काराचा पहिल्यांदा मानकरी ठरला होता.
तर भारतीय खेळाडूने सलग दुसऱ्या महिन्यात हा पुरस्कार पटकावला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला शुभमन गिलची (Shubman Gill) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली होती. भारतीय संघाने मार्च महिन्यात चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) जिंकला. आणि या स्पर्धेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) बरोबरीने श्रेयसने (Shreyas Iyer) सातत्यपूर्ण कामगिरी केली होती.
(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे वानखेडे स्टेडिअमवर स्टँड; अजित वाडेकर, शरद पवार यांचंही स्टँडला नाव)
A #ChampionsTrophy title and now the ICC Men’s Player of the Month award for March 2025 🎖️
Shreyas Iyer is stacking up the accolades 🔥
More ➡️ https://t.co/7Hp7yaqkhl pic.twitter.com/6In83NTLhj
— ICC (@ICC) April 15, 2025
श्रेयसने (Shreyas Iyer) मार्च महिन्यात एकूण ३ एकदिवसीय सामने खेळले आणि ५७.३३ च्या सरासरीने १७२ धावा केल्या. या काळात, त्याने चॅम्पियन्स करंडकाच्या अ गटातील सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७९ धावा, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४५ धावा आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ४८ धावा केल्या, ज्यामुळे भारत विजेता बनला.
(हेही वाचा – Murshidabad Violence : वीर सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर आज बंगालची स्थिती वेगळी असती !)
चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) भारताकडून सर्वाधिक धावा श्रेयसनेच (Shreyas Iyer) केल्या. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत त्याने ५ सामन्यात २४३ धावा केल्या. यामध्ये पाकिस्तानविरुद्ध ५६ धावांचे आणि न्यूझीलंडविरुद्ध ७९ धावांचे अर्धशतक समाविष्ट आहे.
चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) अंतिम सामन्यात श्रेयसने अक्षर पटेलसोबत (Axar Patel) चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. त्याने ४८ धावांची खेळी खेळली. भारताने हा सामना ४ गडी राखून जिंकला. रोहित शर्माने (Rohit Sharma) अंतिम सामन्यात ७६ धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community