Sai Sudharsan : देशासाठी खेळणे मोठी सन्मानाची गोष्ट; भारतीय संघात संधी मिळताच साई सुदर्शनची प्रतिक्रिया

92
Sai Sudharsan : देशासाठी खेळणे मोठी सन्मानाची गोष्ट; भारतीय संघात संधी मिळताच साई सुदर्शनची प्रतिक्रिया
Sai Sudharsan : देशासाठी खेळणे मोठी सन्मानाची गोष्ट; भारतीय संघात संधी मिळताच साई सुदर्शनची प्रतिक्रिया

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून शुभमन गिलकडे (Shubman Gill) भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. तर, ऋषभ पंतला (Rishabh Pant) उपकर्णधार बनवण्यात आले. आयपीएलमध्ये (IPL) चांगली कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला (Sai Sudharsan) पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. दरम्यान, भारतीय कसोटी संघात स्थान मिळाल्यानंतर साई सुदर्शनने (Sai Sudharsan) त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – MSRTC ला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर अखेर कारवाई नाहीच)

साई सुदर्शन (Sai Sudharsan)  म्हणाला की, मला वाटते की, एखाद्या क्रिकेटपटूने देशासाठी खेळणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. ही एक अद्भुत, खास आणि अविश्वसनीय भावना आहे. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा असते, जे त्याचे अंतिम लक्ष्य असते. शुभमन गिल (Shubman Gill) कर्णधार झाल्याबद्दल बोलताना साई सुदर्शन म्हणाला की, “मी त्याला गेल्या चार वर्षांपासून खेळताना पाहत आहे. शुभमन गिल उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ निश्चितच चांगली कामगिरी करेल. त्याच्या नेतृत्वाखाली मी माझी पहिली कसोटी मालिका खेळणार आहे, याचा मला आनंद आहे.”

आयपीएल (IPL) २०२५ मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत साई सुदर्शन (Sai Sudharsan) पहिल्या क्रमांकावर आहे. चालू हंगामात खेळल्या गेलेल्या १३ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत ६३८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून एक शतक आणि पाच अर्धशतके झळकली आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.