Sachin, Sachin! : सचिन तेंडुलकर प्रवास करत असलेल्या विमानात ‘सचिन, सचिन’चा नारा

आपल्या विमानात दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर प्रवास करत असलेलं बघून सहप्रवासीही भारवून गेले. 

175
Sachin, Sachin! : सचिन तेंडुलकर प्रवास करत असलेल्या विमानात ‘सचिन, सचिन’चा नारा
  • ऋजुता लुकतुके

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर अलीकडे आपल्या कुटुंबीयांबरोबर काश्मीरला सुटीवर गेला होता. आणि आपल्या विमानात दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे म्हटल्यावर प्रवाशांना राहवलं नाही. त्यांनी विमानातच ‘सचिन, सचिन’ असा नारा द्यायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Sachin, Sachin!)

विमानात पहिल्या रांगेत सचिन आणि त्याची पत्नी अंजली बसले आहेत. आणि आपल्याला सचिन, सचिन असा आवाज येत आहे. आणि हा आवाज ऐकून सचिनही लोकांचं कौतुक स्वीकारण्यासाठी उभा राहतो असा हा व्हिडिओ आहे. सचिन खेळत असताना तो मैदानावर फलंदाजीला आला की, अशीच आरोळी स्टेडिअममधील तमाम प्रेक्षक ठोकायचे. सचिननेही निवृत्तीच्या कसोटीत, ‘मी आता क्रिकेट खेळणार नसलो तरी, ‘सचिन, सचिन!’ ही तुमची हाक कानात सतत घुमत राहील,’ असं म्हटलं होतं. (Sachin, Sachin!)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हसत हसत लोकांना ‘धन्यवाद’ म्हणाला. तोपर्यंत सगळ्यांनी आपले कॅमेरे सुरू ठेवले होते. (Sachin, Sachin!)

(हेही वाचा – Byculla : तब्बल ९ वर्षांच्या प्रयत्नांनंतर भायखळ्यातील तो भूखंड महापालिकेच्या नावे झाला!)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), पत्नी अंजली आणि मुलगी साराबरोबर काश्मीरला आला होता. इथं त्याने क्रिकेटची बॅट बनवणाऱ्या श्रीनगरमधील एका कारखान्याला भेट दिली. चरसू या गावात हा कारखाना आहे. श्रीनगर-जम्मू रस्त्यावर असलेल्या या कारखान्यातील कर्मचारी सचिनला आलेलं पाहून अवाक झाले होते. सचिनने खुद्द हा व्हीडिओ त्याच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. (Sachin, Sachin!)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कुटुंबीयांचं काश्मीर हे लाडकं पर्यटन स्थळ आहे. १६ नोव्हेंबर २०१३ ला सचिन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्त झाला. त्यानंतर तो मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील फ्रँचाईझीचा सल्लागार आहे. (Sachin, Sachin!)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.