भारताचा आघाडीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आता इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची जादू दाखवताना दिसणार आहे. इंग्लिश काऊंटी संघ यॉर्कशायरने ऋतुराजला करारबद्ध केले आहे. जुलैअखेर ते काऊंटी हंगामा संपेपर्यंत तो या संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
(हेही वाचा – रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आठ दिवसांत हटवा, अन्यथा कारवाई करु ; Avinash Jadhav यांचा इशारा)
“इंग्लिश हंगामाच्या उर्वरित काळात यॉर्कशायरकडून खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या देशात क्रिकेटचा अनुभव घेणे हे माझे नेहमीच ध्येय राहिले आहे. इंग्लंडमध्ये यॉर्कशायरपेक्षा मोठा क्लब नाही. मला माहित आहे की, मी हंगामाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर खेळणार आहे. या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आमच्याकडे काही महत्त्वाचे सामने जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.” असं मत ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) व्यक्त केलं आहे.
(हेही वाचा – Rafael Nadal च्या २०१७ फ्रेंच ओपन फायनलच्या रॅकेटला विक्रमी किंमत)
२८ वर्षीय ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) भारतासाठी एकूण ६ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारत ‘अ’ संघामध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ४१.७७ च्या सरासरीने सात शतके झळकावली आहेत. आता काऊंटी क्रिकेटमध्ये छाप सोडण्याची नामी संधी ऋतुराज गायकवाडला मिळाली आहेे. त्याचप्रमाणे सचिन तेंडलुकर, युवराज सिंग आणि चेतेश्वर पुजारानंतर यॉर्कशायरकडून खेळणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community