Rohit Sharma Retires : रोहितच्या निवृत्तीनंतर पत्नी रितिका सजदेहची प्रतिक्रिया

Rohit Sharma Retires : रितिकाने इन्स्टाग्रामवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

71
Rohit Sharma Retires : रोहितच्या निवृत्तीनंतर पत्नी रितिका सजदेहची प्रतिक्रिया
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्याविषयी चर्चा जरुर होती. पण, तो आयपीएल सुरू असताना तडकाफडकी निर्णय घेईल अशी अटकळ फारशी कुणाला नव्हती. पण, मुंबई विरुद्ध गुजरात टायटन्स हा आयपीएलमधील सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहितने अचानक इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकून आपली निवृत्ती जाहीर केली. रोहित भारताचा २८० वा कसोटीपटू होता. त्यामुळे २८० ही अक्षरं विणलेली आपली निळी टोपी या पोस्टमध्ये होती आणि सोबत लिहिलं होतं, ‘मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, हे मला तुम्हाला कळवायचं आहे. देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य मला लाभलं. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.’ (Rohit Sharma Retires)

रोहितने ही स्टोरी शेअर केल्यानंतर सातच मिनिटांत त्याची पत्नी रितिका सजदेहने रोहितचीच स्टोरी फॉरवर्ड केली आणि खाली ह्रदयभंग झाल्याचे दोन इमोजी आणि एक डोळ्यात अश्रू असलेला इमोजी काढला आहे. (Rohit Sharma Retires)

(हेही वाचा – India Pakistan War : पाकिस्तानच्या गोळीबारात एक भारतीय जवान हुतात्मा ; व्हाईट नाइट कॉर्प्सने वाहिली श्रद्धांजली)

New Project 19 1

३८ वर्षीय रोहितने ६७ कसोटी सामन्यांत ४,३०१ धावा केल्या. यात त्याने १३ शतकं आणि १८ अर्धशतकं केली आहेत. त्याची सरासरीही ४०.५७ अशी चांगली होती. गेल्यावर्षी जून महिन्यात रोहितने टी-२० क्रिकेटमधूनही आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त एकदिवसीय प्रकारात खेळत राहणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या आधीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता. पण, अलीकडे घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियात बोर्डर – गावस्कर चषकात भारताच्या झालेल्या पराभवानंतर आणि खुद्द रोहितच्या घसरलेल्या फॉर्मनंतर त्याच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. (Rohit Sharma Retires)

खासकरून ऑस्ट्रेलियात रोहीत ६.२० धावांच्या सरासरीने फक्त ३२ धावा करू शकला होता. अखेर, शेवटच्या सिडनी कसोटीत रोहितने स्वत:लाच संघातून वगळलं होतं. २४ कसोटींत त्याने भारताचं नेतृत्व केलं आणि यातील १२ भारताने जिंकल्या. तर ९ गमावल्या. विराट आणि महेंद्रसिंग धोनीनंतर तो भारताचा सगळ्यात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. (Rohit Sharma Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.