Rohit Sharma Retires : रोहित शर्माने का घेतली कसोटीतून निवृत्ती, पुढील उद्दिष्टं नेमकी काय आहेत?

Rohit Sharma Retires : रोहितने निवृत्तीनंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

49
Rohit Sharma Retires : रोहित शर्माने का घेतली कसोटीतून निवृत्ती, पुढील उद्दिष्टं नेमकी काय आहेत?
  • ऋजुता लुकतुके

३८ वर्षीय रोहित शर्माने बुधवारी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा आपला निर्णय एका इन्स्टाग्राम स्टोरीतून जाहीर केला. एकदिवसीय क्रिकेट अजूनही खेळत राहणार असल्याचंही तो म्हणाला आहे. एकीकडे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा जवळ आली असताना रोहितने हा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी पत्रकार विमल कुमार यांच्या युट्यूब वाहिनीसाठी दिलेल्या मुलाखतीत त्याने निवृत्तीचा हा निर्णय आणि पुढची लक्ष्य यावर मोकळेपणाने चर्चा केली आहे. (Rohit Sharma Retires)

(हेही वाचा – India Pak War : मुंबईच्या साकीनाका परिसरात ड्रोन दिसल्याचा दावा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहीत संघाचं नेतृत्व करणार आहे.२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाची बोच अजूनही असल्याचं त्याने म्हटलं आहे. भारतातच झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारताने अपराजित राहून सर्वच्या सर्व साखळी सामने जिंकले होते. पण, अंतिम सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्यानंतर रोहितच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकून या पराभवाची थोडी तरी परतफेड केली. पण, रोहितच्या चेहऱ्यावर अजूनही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बसलेल्या धक्क्याची सल दिसते. आता त्याला २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खुणावतो आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि नामिबिया इथं होणार आहे. (Rohit Sharma Retires)

(हेही वाचा – Trans Harbour मार्गावर रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल)

‘मनात तर आहे की, २०२७ चा विश्वचषक खेळावा. पुढे काय होतं बघूया. पण, मी या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. २०२७ मध्ये खेळता आलं तर खूपच छान होईल,’ असं रोहित मुलाखतीत म्हणाला आहे. आपलं लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रीत करण्यासाठी रोहितने स्वत:ला वेळ द्यायचं ठरवलं आहे. जून २०२४ मध्ये रोहितने टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करली आहे. कसोटी प्रकारात रोहीतने ६७ सामने खेळताना ४०.७० च्या सरासरीने ४,३०१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर १२ शतकं आणि १८ अर्धशतकं आहेत. कर्णधार म्हणूनही २४ सामन्यांत संघाचं नेतृत्व करताना त्याने १२ सामने जिंकले आहेत. तर ९ कसोटी गमावल्या आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा बांगलादेश दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पण, सध्या तिथल्या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे हा दौरा सध्या धोक्यात आहे. (Rohit Sharma Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.