-
ऋजुता लुकतुके
रोहित शर्माने तडकाफडकी बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तशीही या प्रकारात त्याचं भवितव्य नेमकं काय असेल यावर चर्चा होतीच. पण, आता रोहितनेच निर्णय जाहीर केल्यामुळे भारतीय संघाला जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठीच नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. रोहित एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे. या प्रकारात तो संघाचं नेतृत्वही करेल, अशी शक्यता आहे. (Rohit Sharma Retires)
निवृत्तीनंतर क्रीडा पत्रकार विमल कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत रोहितने कर्णधार म्हणून केलेली कामगिरी आणि तेव्हाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपली कर्णधार म्हणून नियुक्ती होईल, याची खात्री नव्हती, असं रोहित म्हणतो. ‘मला नव्हतं वाटलं, कर्णधार म्हणून माझा विचार होईल. कारण, सगळ्यांना तरुण कर्णधार हवा असतो, जो १०, १५ वर्षं राष्ट्रीय संघाचं नेतृत्व करू शकेल. मी तर इतकी वर्षं खेळणार नाही, मला माहीत होतं. त्यामुळे मला कर्णधार करतील, असं मला वाटलं नव्हतं. पण, मला नेतृत्व करायला मिळालं यासाठी मी बीसीसीआयचा आभारी आहे,’ असं हसत हसत रोहित म्हणाला. (Rohit Sharma Retires)
एकदा कप्तानी मिळाल्यावर त्याचा दृष्टिकोन कसा होता, हे ही रोहितने सांगितलं.
(हेही वाचा – IPL Suspended : भारत – पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित)
Countless memories, magnificent moments.
Thank you, Captain 🫡🫡#RohitSharma pic.twitter.com/l6cudgyaZC
— BCCI (@BCCI) May 7, 2025
बीसीसीआयला आता नवीन कर्णधार निवडावा लागणार आहे आणि शुभमन गिल त्यासाठी आघाडीचं नाव आहे. पण, रोहित आपल्या कप्तान म्हणून कारकीर्दीवर समाधानी आहे. ‘कर्णधार म्हणून मला जितका वेळ मिळेल, तेवढा संघासाठी वापरायचा आणि संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घ्यायची, इतकंच मी ठरवलं होतं. मी दहा वर्षं या जागी नसणार हे मला सुरुवातीपासूनच ठाऊक होतं. कप्तानीवर मी माझी पूर्ण ताकद लावली,’ असं रोहित म्हणाला. (Rohit Sharma Retires)
अलीकडे न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेला कसोटीतींल पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियातील बोर्डर – गावस्कर चषकातील अपयश यामुळे भारतीय संघात स्थित्यंतराचे वारे वाहू लागले. शिवाय रोहितचा वैयक्तिक फॉर्मही चांगला नव्हता. ऑस्ट्रेलियात तर अखेरच्या सिडनी कसोटीत रोहितने स्वत:लाच वगळण्याचा निर्णय घेतला होता. या दौऱ्यानंतर रोहितचं कसोटीतील भवितव्य नेमकं काय असेल यावर चर्चा सुरू झाली होती. (Rohit Sharma Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community