Rohit Sharma on World Cup : ‘मला एखादा तरी विश्वचषक जिंकायचाय’

320
IPL 2024 Mumbai Indians : कोलकाता संघाविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून का खेळला?
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून (Australia) झालेला पराभव भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अजूनही विसरलेला नाही. शिवाय क्रिकेटसाठीची त्याची कटीबद्धताही अजून कायम आहे. त्यामुळे सध्या तरी निवृत्तीचा कुठलाही विचार नसल्याचं अलीकडेच रोहित शर्माने (Rohit Sharma) एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. एकदा तरी विश्वचषक स्पर्धा (World Cup Tournament) जिंकायची आहे, त्यासाठी खेळत राहणार असल्याचं त्याने म्हटलंय. (Rohit Sharma on World Cup)

(हेही वाचा- Ayodhya Ram Mandir: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर साजरी होणार पहिली ‘श्रीराम नवमी’; कशी सुरू आहे प्रशासनाची तयारी ? जाणून घ्या…)

‘ब्रेकफास्ट विथ गौरव कपूर’ या कार्यक्रमात रोहित म्हणतो, ‘मी अजून निवृत्तीचा खराखुरा विचार केलेला नाही.’ पण, त्यानंतर थोडा सावध झालेला रोहित पुढे म्हणतो, ‘मी असं म्हणतोय की, निवृत्तीचा विचार केलेला नाही. पण, आयुष्य कुठे घेऊन जाईल , हे सांगता येत नाही. पण, सध्या मी चांगला खेळतोय. आणि काही वर्षं मी असाच खेळू शकतो.’ (Rohit Sharma on World Cup)

भारतासाठी विश्वचषक स्पर्धा (World Cup Tournament) जिंकण्याचा इरादा त्याने बोलून दाखवला आहे. २०२५ मध्ये असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर आता त्याने लक्ष केंद्रीत केलं आहे. एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाची बोच अजूनही रोहितच्या मनामध्ये आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने साखळीतील सर्व सामने निर्विवाद जिंकले. पण, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ६ गडी राखून पराभव झाला. चाहत्यांनाही हे दु:ख पचवणं कठीण गेलं. (Rohit Sharma on World Cup)

(हेही वाचा- Dhoni, Sachin & Rohit : धोनी, सचिन आणि रोहित एकाच टेबलवर बसलेला व्हीडिओ व्हायरल )

‘एकदिवसीय क्रिकेट आणि एकदिवसीय विश्वचषक बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे माझ्या पिढीसाठी हाच विश्वचषक खरा आहे. तिथे इतकी चांगली कामगिरी करून आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो होतो. घरच्या मैदानात, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत होतो. आम्हाला तीच खरी संधी होती. सगळं सुरळीत सुरू आहे. फक्त एक सामना बाकी आहे, असं मनात असताना, नेमकी तोच एक सामना आम्ही हरलो. ते दु:ख कायम मनात राहील,’ असं रोहितने बोलून दाखवलं. (Rohit Sharma on World Cup)

(हेही वाचा- Nilam Gorhe: “कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत लवकरच कळेल”, नीलम गोऱ्हेंची उद्धव ठाकरेंवर टीका)

प्रेक्षकांनी मात्र भारताचा पराभव इतका जिव्हारी लावून घेतला नाही. लगेच खेळाडूंना माफही केलं, याबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानले. (Rohit Sharma on World Cup)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.