
- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या क्रिकेट कारकीर्दीच्या उत्तरार्धाकडे झुकला आहे. टी-२० क्रिकेट पाठोपाठ आलीकडेच त्याने कसोटीतूनही निवृत्ती स्वीकारली आहे. पण, एकदिवसीय क्रिकेट तो खेळणार आहे. आणि भारतीय संघाचं नेतृत्वही करत आहे. त्यामुळे बीसीसीआयने अजूनही त्याला मध्यवर्ती करारात ए प्लस श्रेणीत कायम ठेवलं आहे. नैसर्गिक फटकेबाजीची देणगी लाभलेला फलंदाज अशी त्याची क्रिकेट विश्वात ओळख आहे. आणि त्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि नेतृत्वासाठीही त्याने आपली खास जागा तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार त्याच्या नावावर आहेत. आणि त्यामुळे ‘हिटमॅन’ असं बिरुद त्याने कमावलं आहे. २००७ पासून भारतीय संघात खेळणाऱ्या हिटमॅनचा खरा जम बसला तो २०१३ मध्ये, जेव्हा चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) स्पर्धेत धोनीने त्याला सलामीला खेळवलं. सेहवाग आणि पाठोपाठ गंभीर निवृत्त झाल्यावर ती जागा रिकामी होती. आणि तेव्हापासून रोहित या जागेवर चपखळ बसला. (Rohit Sharma Net Worth)
क्रिकेटच्या जोरावर रोहितने आयपीएलमधील (IPL) मोठे करार आणि जाहिरातीही मिळवल्या आहेत. एक नजर टाकूया रोहितची राजेशाही जीवनशैली. जाहिराती आणि आयपीएलमधून (IPL) त्याची मिळकत आणि त्याच्या ताफ्यातील गाड्यांविषयी. (Rohit Sharma Net Worth)
(हेही वाचा – KL Rahul For T20 : के एल राहुलचा भारतीय टी-२० संघासाठी विचार?)
२०२४ पर्यंत रोहित शर्माची (Rohit Sharma) एकूण मिळकत आहे २१४ कोटी रुपये. बीसीसीआयबरोबर (BCCI) खेळाडू मध्यवर्ती करार करतात. यात रोहित ए प्लस या श्रेणीत मोडतो. त्यामुळे त्याला करारापोटी वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. शिवाय एका कसोटीसाठी १५ लाख रु, एकदिवसीय सामन्यासाठी प्रत्येकी ६ लाख रुपये आणि टी-२० सामन्यासाठी त्याला प्रत्येकी ३ लाख रुपये मिळतात. यंदा मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलसाठी १६.३ कोटी रुपये मोजून रोहितला आपल्याकडे ठेवलं आहे. (Rohit Sharma Net Worth)
शिवाय जाहिरातींमधूनही रोहितला तगडी कमाई होते. आदिदास, ला लिगा, ओकली यासारख्या कंपन्यांचा तो ब्रँड अँबेसिडर आहे. आणि एका जाहिरातीसाठी सध्या तो ५ कोटी रुपये घेतो. त्याने आतापर्यंत जवळ जवळ २४ ब्रँडची जाहिरात केली आहे. मूळचा मुंबईतील बोरिवली उपनगरातील असलेला रोहित सध्या वांद्रे इथं ६,००० वर्गफुटांच्या घरात राहतो. या घराची किंमत ३०० दशलक्ष रुपये इतकी आहे. निळी लँबॉर्गिनी ही रोहितची आवडती कार आहे. मुंबईत असेल तर अनेकदा तो या गाडीतून कुटुंबाबरोबर फिरताना दिसतो. याशिवाय फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू एक्स३, मर्सि़डिज जीएलएस अशा गाड्याही त्याच्या ताफ्यात आहेत. (Rohit Sharma Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community