दोन दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा स्टार खेळाडू Rohit Sharmaने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी कुणाची वर्णी लागणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंडविरुध्द कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला कर्णधारपदाबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.
(हेही वाचा IPL Suspended : भारत – पाक तणावामुळे आयपीएल स्थगित झाल्यावर खेळाडू आपापल्या गावी पांगले )
दरम्यान, टीम इंडियाच्या कर्णधारपदी शुभमन गिल, के एल राहुल, करुण नायर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्याचबरोबर, आगामी इंग्लंड दौऱ्याकरिता बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्याकरिता पूर्वतयारी करण्यात येत असून बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना पासपोर्टसाठी आणि इतर आवश्यक कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर, टीम इंडियाच्या जर्सी साईजसाठी लॉजिस्टिक्ससोबत संपर्क करण्यात आला. दि. २३ मे रोजी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ मधील पहिली मालिका असणार आहे. तर अंतिम कसोटी सामना ३१ जुले ते ०४ ऑगस्ट दरम्यान लंडन येथे सामना खेळविण्यात येईल. Rohit Sharma