Rohit Sharmaचा कसोटी क्रिकेटला अलविदा, एकदिवसीय टीमच्या कर्णधारपदी कायम

Rohit Sharma : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

112

Rohit Sharma : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषविणार आहे. भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेतली असून आगामी इंग्लंडविरुध्दच्या सामन्यांआधीच घेतलेल्या निर्णयाने क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

(हेही वाचा Operation Sindoor : भारतीय सैन्यदलांनी शौर्य दाखवित रचला नवा इतिहास, संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार )

दरम्यान, रोहित शर्माने आपल्या कसोटी निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिली. आपल्या पोस्टमध्ये रोहित शर्माने म्हटले की, सर्वांना नमस्कार, मी फक्त हे सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या संघात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक पूर्ण सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय स्वरूपात भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन.

रोहित शर्माच्या रोहितने गेल्या वर्षी कर्णधार असताना भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० मधून निवृत्ती घेतली होती. त्याने बुधवारी संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना निवृत्तीची माहिती दिली. रोहित शर्माने आपल्या टेस्ट कारकिर्दीत ६७ कसोटी सामने खेळले असून ४०.५७ च्या सरासरीने ४,३०१ धावा कुटल्या आहेत. यात १२ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश असून ऑक्टोबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या रांची येथील कसोटी सामन्यात आजवरची सर्वाधिक २१२ धावांची खेळी केली.(Rohit Sharma)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.