Rohan Bopanna, French Open 2024 : भारताचा रोहन बोपान्ना फ्रेंच ओपन दुहेरीत उपान्त्य फेरीत 

Rohan Bopanna, French Open 2024 : बेल्जियन जोडीचा पराभव करत बोपान्ना, एबडन जोडी उपान्त्य फेरीत पोहोचली आहे 

61
Rohan Bopanna, French Open 2024 : भारताचा रोहन बोपान्ना फ्रेंच ओपन दुहेरीत उपान्त्य फेरीत 
Rohan Bopanna, French Open 2024 : भारताचा रोहन बोपान्ना फ्रेंच ओपन दुहेरीत उपान्त्य फेरीत 
  • ऋजुता लुकतुके 

यंदाच्या फ्रेंच ओपनमधील एकमेव भारतीय आव्हान असलेला दिग्गज टेनिसपटू रोहन बोपान्ना फ्रेंच ओपन स्पर्धेत (Rohan Bopanna, French Open 2024 ) पुरुषांच्या दुहेरीत उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डनसह त्याने बेल्जिअन जोडीचा ७-६, ५-७ आणि ६-१ असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन – भारतीय जोडीला या स्पर्धेत द्वितीय मानांकन मिळालं आहे. आणि त्यांनी १० व्या मानांकीत सँडर गिल (Sander Gill) आणि योरान विलिगेन (Yoran Willigen) या जोडीचा १ तास ४ मिनिटांत पराभव केला. (Rohan Bopanna, French Open 2024 )

 पहिले दोन सेट हे तुल्यबळ झाले. दोन्ही जोड्यांनी सर्व्हिसवर चांगला खेळ केला. पहिल्या टायब्रेकरवर एब्डन आणि बोपान्ना यांनी ६-३ असा विजय मिळवत हा सेट नावावर केला. पण, दुसऱ्या सेटमध्ये बोपान्नाची सर्व्हिस एकदा भेदली गेली. त्यामुळे दुसरा सेट या जोडीला ५-७ असा गमवावा लागला. पण, तिसऱ्या सेटमध्ये खेळावर पूर्ण वर्चस्व मिळवत बोपान्ना – एब्डन जोडीने फक्त एक गेम गमावत हा सेट ६-१ ने जिंकला. सामनाही खिशात टाकला. (Rohan Bopanna, French Open 2024 )

(हेही वाचा- Delhi CM Arvind Kejriwal यांना जामीन देण्यास नकार; न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ)

या जोडीची गाठ आता इटालियन जोडी सिमोन बोलेली आणि आंद्रे वावासोरी यांच्याशी पडणार आहे. गेल्यावर्षी बोपान्ना आणि एब्डन यांनी ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. ४१ व्या वर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून बोपान्नाने विक्रम साध्य केला होता. तो वयाने सगळ्यात मोठा ग्रँडस्लॅम विजेता आणि अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू आहे. आता आणखी दोन सामने जिंकून आपलाच विक्रम मोडण्याची संधी त्याला आहे. (Rohan Bopanna, French Open 2024 )

उपउपान्त्य फेरीचा सामना जिंकल्यानंतर बोपान्नाचं जमलेल्या प्रेक्षकांनी अभिनंदन केलं. त्याला उभं राहून मानवंदना देण्यात आली. (Rohan Bopanna, French Open 2024 )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.